Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

गुरुवार पासून काश्मीर होणार यात्रेकरूंसाठी खुले

Share

जम्मू काश्मीर | जम्मू-काश्मीरमधून अमरनाथ यात्रेकरू आणि पर्यटकांना माघारी पाठविण्याबाबत गृह विभागाने जारी केलेला 2 ऑगस्टचा आदेश जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मागे घेतला आहे. राज्यपाल मलिक यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

त्यामुळे कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर आता प्रथमच पर्यटकांना जम्मू-काश्मीरमध्ये जाता येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 10 ऑक्टोबरपासून होणार असून सर्वसामान्य पर्यटकांना काश्मीरमध्ये पर्यटनासाठी जाता येणार आहे.

जम्मू-काश्मीरमधील स्थिती पूर्ववत करण्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय असल्याचे मानले जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये ब्लॉक विकास बोर्डाच्या निवडणुकादेखील घेण्याची घोषणा गेल्या आठवड्यात करण्यात आली होती. त्यानंतर तिथे पर्यटकांना प्रवेश देण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!