काश्मीर : सीआरपीएफ जवानांकडून पॅलेट गन ऐवजी आता प्लास्टिक गोळ्यांचा वापर

0

काश्मीर खोऱ्यात आता कमी घातक असलेल्या प्लास्टिक गोळ्यांचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय राखीव दलाने (सीआरपीएफ) एक लाख प्लास्टिक गोळ्या पाठवल्या आहेत. या गोळ्या नव्यानेच विकसित करण्यात आल्या आहेत.

संरक्षण संशोधन विकास संस्थेकडून (डीआरडीओ) विकसित आणि पुण्यातील शस्त्र निर्मिती कारखान्यात उत्पादित झालेल्या या गोळ्या ‘एके’ मालिकेतील रायफलींमध्ये भरता येऊ शकतात. वादग्रस्त ठरलेल्या पॅलेट गनला या गोळ्या पर्याय असतील.

चाचणीमध्ये या प्लास्टिक गोळ्या कमी घातक आढळल्या असून त्यामुळे दंगेखोरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पॅलेट गन व इतर हत्यारांवर अवलंबून राहणे कमी होईल, असे सीआरपीएफचे महासंचालक आर.आर. भटनागर यांनी म्हटले.

काश्मीर खोऱ्यातील दंगेखोरांशी निपटण्यासाठी सुरक्षा दलांकडून प्रयोग करण्यात येणारी या सर्वांत नवीन व कमी घातक असलेल्या गोळ्या आहेत. खोऱ्यातील सीआरपीएफच्या विविध तुकड्यांना या गोळ्यांचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती भटनागर यांनी दिली.

LEAVE A REPLY

*