Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या हिट-चाट

बॉलिवूडच्या ‘ठग्स…’ला टक्कर देत ‘डॉ. काशिनाथ घाणेकर हिट

Share

मुंबई – मराठमोळा अभिनेता सुबोध भावे याचा ‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. बॉक्स ऑफिसवर ‘ठग्स ऑफ हिन्दोस्तान’च्या शर्यतीत उतरुन या चित्रपटाने बाजी मारली आहे. दर्जेदार संवाद आणि दमदार अभिनयाने नटलेल्या ‘काशिनाथ घाणेकर’ची हवा सध्या बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळतेय.

पहिल्यांदाच एका हिंदी चित्रपटाला टक्कर देत मराठमोळ्या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस पाहायला मिळत आहेत. अभिजीत देशपांडे, गुरू ठाकूर आणि प्रशांत दळवी यांच्या लेखणीतून उतरलेल्या कडक संवादांनी आणि अभिनयाने नटलेल्या या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घातली आहे. त्यामुळे सगळीकडे चित्रपटातील संवादाचीच हवा दिसत आहे.

मराठी रंगभूमीवरच्या पहिल्या-वहिल्या सुपरस्टार काशिनाथ घाणेकर यांचे कलाप्रेम उलगडणारा हा चित्रपट अजूनही चित्रपटगृहांमधून गर्दी खेचतो आहे. या चित्रपटाच्या यशाने यशराज प्रॉडक्शनच्या ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’च्या नाकीनऊ आणले असून पहिल्यांदाच या मराठी चित्रपटामुळे आमिर खान आणि अमिताभ बच्चन या मातब्बरांचा चित्रपट आठवडय़ाभरातच चित्रपटगृहांमधून उतरवावा लागला आहे.

अलिकडेच नागराज मंजुळे यांचा ‘नाळ’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. हा चित्रपटदेखील प्रेंक्षकाची मने जिंकताना दिसत आहे. याचे मुख्य आकर्षण आहे, तो म्हणजे यातील बालकलाकार श्रीनिवास पोकळे. त्याच्या निरागस अभिनयामुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!