Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारावरुन परतताना कारचा अपघात, ६ महिलांचा मृत्यू

Share

बेळगाव : नातेवाईकाचे अंत्यविधी करून परतणाऱ्या बोलेरो गाडीला ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा महिला ठार झाल्या तर १० जण जखमी झाले. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. बेळगावमधील गोकाक तालुक्यातील हिरेनंदी गावाजवळ आज सकाळी ही दुर्दैवी घटना घडली.

सौंदत्ती तालुक्यातील माडमगेरी आणि यरझरवी येथे राहणारे 16 जण गोकाक धबधबाजवळील गावात गेले होते. नातेवाईकाचे निधन झाल्याने तिथे गेले होते. सोमवारी रात्री सर्व जण कारमधून गावी परतण्यासाठी निघाले. गोकाक तालुक्यात संखेश्वर – नारगुंड महामार्गावर एका ट्रॅक्टरला त्यांच्या कारने धडक दिली. ऊसाने भरलेला ट्रॅक्टर थांबला होता.

अंधारात कार चालकाला हा ट्रॅक्टर दिसला नाही आणि हा अपघात झाल्याचे समजते. ट्रॅक्टर चालकाने नियमांचे पालन केले नव्हते. ट्रॅक्टरच्या मागील लाईटही ऊसामुळे झाकले गेले होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातानंतर ट्रॅक्टरचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. या अपघातात 10 जण जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!