Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

कर्नाटक : म्ह्णून ‘या’ गावात लावले बेडकांचे ‘लग्न’

Share

उडुपी : वाढत्या तापमानामुळे आणि लांबणीवर पडलेला मान्सून यामुळे नागरिकांमध्ये पावसाची आतुरता वाढली आहे. दरम्यान पाऊसाचे आगमन व्हावं यासाठी अनेक ठिकाणी होम हवन, पूजा पाठ तसेच प्राण्यांमध्ये लग्न अशा गोष्टी केल्या जातात. कर्नाटकमध्ये अशीच घटना घडली असून या ठिकाणी उन्हाने होरपळलेल्या नागरिकांनी पाऊस यावा यासाठी चक्क बेडकांचे लग्न लावले आहे.

कर्नाटकमधील उडुपी या शहरात हा विधी आयोजित करण्यात आला आहे. यासाठी ढोलताशांसह मिरवणूक काढण्यात येणार आहे. या शहरातील जिल्हा सदस्य समिती आणि पंचरत्न सेवा ट्रस्ट तर्फे आयोजित एका कार्यक्रमात या बेडकांचे लग्न रितीरिवाजानुसार लावण्यात येणार आहे.

यावेळी वरुण आणि वर्षा अशी वाढू वराची नाव असणार्या बेडकांचे लग्न लावण्यात आले. या दोघांनाही वधूवरांच्या वेशात सजविण्यात आले होते.

या कार्यक्रमात आलेल्या नागरिकांनी या निधीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. त्यांनी सांगितले कि, हा विधी केल्यानंतर नक्कीच वरुण राजा बरसणार आहे . त्यामुळे हा विधी कारण गरजेचे असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!