कर्नाटक एक्स्प्रेसचा डबा मनमाडजवळ निखळला; कमी वेगामुळे अनर्थ टळला

0

मनमाड (प्रतिनिधी) ता. २  : धावत्या कर्नाटक एक्स्प्रेसमधील बोगीचा सांधा निखळून बोगी वेगळी झाल्याची घटना आज काही वेळापूर्वी मनमाडजवळ घडल्याने प्रवाशांत खळबळ उडाली.

दिल्ली-बंगलोर कर्नाटक एक्स्प्रेस या धावत्या गाडीचा सांधा (कपलिंग)  निघाला. गाडी रेल्वे स्थानकात प्रवेश करतेवेळी गाडीचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला.

स्टेशन मास्तराने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दुसरी कपलिंग लावून गाडी स्टेशनात आणली.

LEAVE A REPLY

*