Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

कर्नाटक नाट्यावर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार

Share

नई दिल्ली | वृत्तसंस्था 

कर्नाटक विधानसभा अध्यक्षांना १५ आमदारांच्या राजीनामा स्वीकारण्याच्या मागणीवर आज दाखल असलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीवर कर्नाटक सरकारचे १४ महिने जुन्या कुमारस्वामी सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

दरम्यान, मंगळवारी सर्व पक्षियांचे म्हणणे ऐकल्यानंतर आज सर्वोच्च न्यायालय आपला निर्णय देणार आहे. कुमारस्वामी आणि  विधानसभा अध्यक्ष यांनी या आमदारांच्या सुनावणीवर विचार विनिमय आणि न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रावर प्रश्न उपस्थित केला आहे.

तर तिकडे विधानसभा अध्यक्ष के. आर रमेश कुमार बहुमत गमवलेल्या सरकारला सहारा देण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. ते म्हणाले की, राजीनामा दिलेल्या आमदारांचा राजीमाना स्वीकारण्याबाबत आणि त्यांना विधानसभेत अयोग्य ठरविण्याबाबत निर्णय देण्याचा प्रयत्न व्हायला हवे होते.

उद्या मुख्यमंत्री कुमारस्वामी हे विधानसभेट विश्वास ठराव पास करतील. त्याअगोदरच जर विधानसभा अध्यक्षांनी या आमदारांचा राजीनामा स्वीकारला तर हे सरकार पडेल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!