Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

कर्नाटक नाट्य : कुमारस्वामी पोहोचले मंदिरात; येडीयुरप्पा यांनी केली कुमारस्वामींच्या राजीनाम्याची मागणी

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था 

कर्नाटक मधील सत्ता संघर्षावर १५ बंडखोर आमदारांना दिलासा मिळाला आहे. आमदारांनी उद्या  बहुमत सिद्ध होताना विधानसभेत हजेरी लावलीच पाहिजे याबाबत कोन्हीही दबाव आणू शकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तर विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घ्यावा असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर कर्नाटक सरकारचे भवितव्य अवलंबून आहे.

तर आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजप नेते येडीयुराप्पा यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करत  कर्नाटक सरकारने बहुमत गमावले असून उद्या रीतसर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएसच्या १५ बंडखोर आमदारांना विधानसभेत हजेरी लावण्यासाठी बळजबरी केली जाऊ शकत नाही असा निर्णय देत सर्वोच्च न्यायालायने कुमारस्वामी यांच्या सरकारला जोरदार झटका दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कर्नाटक सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत. गुरुवारी म्हणजेच उद्या कुमारस्वामी विश्वासदर्शक ठराव मांडणार असून सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर आमदारांना यामध्ये सहभागी व्हायचं की नाही याचा निर्णय घेण्याची मुभा बंडखोर आमदारांना दिली आहे.

तर तिकडे कुमारस्वामी एका मंदिरात पूजा अर्चना करताना दिसून आल्यामुळे हा फोटोही अनेक ठिकाणी व्हायरल झालेला दिसून आला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!