Type to search

Featured देश विदेश मुख्य बातम्या

कर्नाटक पेच : विधानसभा अध्यक्षांकडे बाजू मांडण्याचे बंडखोर आमदारांना आदेश

Share

अध्यक्षांनी जर आमदारांचं म्हणणं ऐकलं नाही तर उद्या पुन्हा सुनावणी

नवी दिल्ली – कर्नाटकातील बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असले तरी न्यायालयाने आमदारांना अगोदर आपली बाजू विधानसभा अध्यक्षांकडे मांडा असे स्पष्ट आदेश दिले आहेत. तसेच या आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारची असल्याचे सांगत आमदारांना सुरक्षा पुरवण्यासही न्यायालयाने सरकारला सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयात बंडखोर आमदारांच्या बाजून मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजाच्या पद्धतीवर आक्षेप घेत अध्यक्ष आपले कर्तव्य व्यवस्थित बजावत नसल्याचे म्हटले. तसेच राज्यात नाजूक परिस्थिती असून तब्बल 15 आमदारांनी राजीनामे दिले असून अध्यक्ष याबाबतचा निर्णय लांबणीवर टाकत असल्याचे रोहतगी यांनी म्हटले. विधानसभा अध्यक्षांवर नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप रोहतगी यांनी केला त्यावर न्यायालयाने आमदारांना पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांकडे आपली बाजू मांडण्याचे आदेश मुख्य न्यायाधिशांनी दिले. तसेच अध्यक्षांनी जर आमदारांचं म्हणणं ऐकलं नाही, तर सर्वोच्च न्यायालय उद्या (12 जुलै) ला पुन्हा या प्रकरणी सुनावणी करेल असं न्यायाधीशांनी म्हटलं.

मी का राजीनामा देऊ? कुमारस्वामींचा पत्रकारांना प्रतिप्रश्न

बंगळूरू – सत्ताधारी काँग्रेस-जेडीएसच्या 16 आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे कुमारस्वामी सरकार संकटात सरकार टिकणार की, नाही अशी स्थिती असताना कुमारस्वामी राजीनामा द्यायला तयार नाहीत. मी राजीनामा का देऊ? मी आताच राजीनामा देण्याची काय गरज आहे? असा उलटा सवाल कुमारस्वामी यांनी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर केला.

आघाडी सरकार कोसळण्याच्या स्थितीत असल्यामुळे कुमारस्वामी राजीनामा देऊ शकतात अशी चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कुमारस्वामी यांनी मी राजीनामा का देऊ ? असा प्रतिप्रश्न केला. 2009-10 साली काही मंत्र्यांसह 18 आमदार तत्कालिन मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्या विरोधात समोर आले होते. पण त्यावेळी येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला नव्हता ही आठवण त्यांनी करुन दिली. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी गुरुवारी वरिष्ठ काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा केली. बुधवारी आणखी दोन आमदारांनी राजीनामा दिला. राजीनामा देणार्‍या आमदारांची संख्या आता 16 झाली आहे. आमदारांचे राजीनामे स्वीकारले गेले तर बहुमतातले कुमारस्वामी सरकार अल्पमतामध्ये येईल.

दिल्लीत विरोधकांची निदर्शने

कर्नाटकामध्ये आमदारांना खरेदी करून तेथील सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, असा आरोप काँग्रेसने भाजपवर केला आहे. कर्नाटकात निर्माण झालेल्या या स्थितीचा विरोध करण्यासाठी काँग्रेसने संसद परिसरात धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे इतर मोठे नेतेही सहभागी झाले होते. कर्नाटकपाठोपाठ गोव्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवरही काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात काँग्रेसने कर्नाटक आणि गोव्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीला विरोध करण्याची रणनीती आखली आहे. संसद परिसरात धरणं देतं राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली आहे. तसेच गोवा आणि कर्नाटकातील राजकीय परिस्थितीला भाजप जबाबदार असल्याने त्याचा निषेध करण्यासाठीच आम्ही निदर्शने करत असल्याचं राहुल यांनी सांगितलं.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!