Type to search

Breaking News Featured maharashtra आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

Breaking# कर्नाटकात कुमारस्वामींच सरकार अखेर कोसळले

Share

बंगळूरू – अनेक दिवसांपासून सुरू असलेले कर्नाटकातील राजकीय नाट्य अखेर काल संपले असून नाट्यमय घडामोडीनंतर मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचं सरकार कोसळले. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 99 मते पडली, तर ठरावाच्या विरोधात 105 मते पडल्याने कुमारस्वामी सरकार अखेर पडले. अवघ्या चार मतांनी कुमारस्वामींना बहुमत गमवावं लागलं आहे. त्यामुळे भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, सरकार कोसळल्यानंतर कुमारस्वामी यांनी राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

कुमारस्वामी सरकार आज विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कर्नाटकात कलम 144 लागू करण्यात आलं होतं. संध्याकाळी 7.30 वाजता कुमारस्वामींनी विश्वासदर्शक ठराव मांडला. त्यानंतर विधानसभेतील उपस्थित आमदारांची मोजदाद करण्यात आली आणि नंतर विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यात आलं.

16 बंडखोर आमदार विधानसभेत अनुपस्थित राहिल्याने बहुमताचा आकडा 103 वर आला. मात्र कुमारस्वामींना बहुमताचा आकडा गाठता आला नाही. ठरावाच्या बाजूने केवळ 99 मते पडल्याने अवघ्या चार मताने कुमारस्वामी सरकार कोसळलं. तर ठरावाच्या विरोधात 105 मते पडली. यावेळी भाजपचं एकही मत फुटलं नाही. जेडीएस-काँग्रेसचे 16 बंडखोर आमदार सभागृहात अनुपस्थित राहिले तर बसपाचा उमेदवार तटस्थ राहिल्याने कुमारस्वामींना विश्वासदर्शक ठराव जिंकता आला नाही.

भाजपचा जल्लोष –

विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात कुमारस्वामी सरकार अपयशी ठरल्यानंतर भाजपने एकच जल्लोष केला. सरकार कोसळल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपच्या आमदारांनी वेलमध्ये येऊन भाजप नेते बी.एस. येदीयुरप्पा यांचे अभिनंदन केले. काही आमदारांनी तर येदीयुरप्पा यांचं दर्शनही घेतलं.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!