Type to search

Featured देश विदेश मुख्य बातम्या

आमचे सरकार देवाचे, न्याय होईल कुमारस्वामींचा भाजपला इशारा

Share

बंगळुरू – कर्नाटकचे काँग्रेस-जेडीएसचे आघाडी सरकार हे देवाचे सरकार असून योग्य न्याय करण्यासाठी न्यायाचा दिवस येणार आहे , अशा शब्दांत राजकीय पेचात सापडलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी बायबलचा हवाला देत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. आमच्या आघाडीला दैवाने सत्तेवर बसवले असून विरोधकांना दैव नक्कीच शिक्षा करेल, असा थेट इशाराच मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विरोधकांना दिला आहे.

विधानसभेत बोलताना कुमारस्वामी यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. आमचे सरकार पाडण्यासाठी आमचे आमदार त्यांच्या बाजूने वळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने चुकीचे मार्ग अवलंबल्याचा आरोपही कुमारस्वामी यांनी केला. या वेळी बोलताना कुमारस्वामी यांनी बायबलमधील न्यायाच्या दिवसाचा (जजमेंट डे) आवर्जून उल्लेख केला. एक दिवस प्रत्येकाला सर्वशक्तिमान ईश्वरापुढे आपल्या कर्माचा पाढा वाचावाच लागतो. तो न्यायाचा दिवस असतो. तिथे ना वकील असतो, ना खोटे चालते, ना मुखवटा कामी येतो. ईश्वरापुढे आपल्या कर्माचे खरेखुरे मोजमाप होते, असे म्हणत कुमारस्वामी यांनी भारतीय जनता पक्ष मपापफ करत असून त्यानुसार त्यांना नक्कीच फळ मिळेल असे सूचित केले आहे.

मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे भाऊ आणि कर्नाटक सरकारमधील एक मंत्री एच. डी. रेवण्णा सरकार वाचवण्याठी काळी जादू करत आहेत या विरोधकांच्या टीकेचाही कुमारस्वामी यांनी समाचार घेत रेवण्णा यांचे समर्थन केले. आपल्या बंधूंचा देवाची पूजा केल्याशिवाय दिवस सुरूच होत नाही, असे कुमारस्वामी म्हणाले. मते महालक्ष्मी मंदिरात गेल्यानंतर तेथील पुजारी त्यांना इलायची माला देतात. रेवण्णा अंजनेय मंदिरातही जातात. तेथे पुजारी त्यांना लिंबू देतात. सरकार वाचवण्यासाठी रेवण्णा काळी जादू करतात या विरोधकांचा आरोपाची मला कल्पना आहेफ, असे म्हणत भारतीय जनता पक्षाचे आमदार मंदिरात जात नाहीत का, तिथे पुजारी त्यांना प्रसाद देत नाहीत का, असे प्रश्न कुमारस्वामी यांनी उपस्थित केले आहेत. मी आणि माझे कुटुंब पापभिरू आहे हे सांगायला मला मुळीच संकोच वाटत नाही, असेही ते म्हणाले.

तर देव माझे मुख्यमंत्रिपद काढून घेईल –

मी परिस्थितीचे अपत्य आहे आणि मला मिळालेले मुख्यमंत्रिपद हे देवाची भेट असल्याचे मी समजतो. देवाला जेव्हा वाटेल की माझे मुख्यमंत्रिपद काढून घ्यावे तेव्हा तो ते काढून घेईल. आपण केवळ दैवाच्या खेळातील एक प्यादे आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!