कर्नाटक – उद्या बहुमत सिद्ध करा, येडियुरप्पांना कोर्टाचे आदेश

0
नवी दिल्ली : कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देखील येडियुरप्पा यांचं हे पद किती काळ टिकणार असा प्रश्न होता. कारण भाजपला अपेक्षित बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. अखेर दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर भाजपने शनिवारी दुपारी ४ वाजता बहुमत सिद्ध करावे असे आदेश दिले. बहुमत चाचणी सोमवारी घ्यावी, ही भाजपाची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे भाजप चांगलाच पेचात पडला आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा उद्या बहुमत सिद्ध करणार का? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे

दरम्यान भाजपाच्या वतीने अॅड. मुकुल रोहतगी, काँग्रेसच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी, केंद्र सरकारच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, जनता दल सेक्यूलरच्या वतीने कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली.

LEAVE A REPLY

*