कर्नाटक निवडणूक : काँग्रेसचे दोन तर भाजपचे १ आमदार गायब

0
बेंगळूर : कर्नाटक विधानसभेत शनिवारी बहुमत चाचणी होणार असतानाच काँग्रेसचे दोन आमदार अजूनही बेपत्ता आहेत. प्रताप गौडा आणि आनंद सिंह हे दोघे आमदारांच्या शपथविधीसाठी विधिमंडळात पोहोचू शकलेले नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.तर भाजपाचे एक आमदारही अजूनही विधिमंडळात उपस्थित न झाल्याने भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. सोमशेखर रेड्डी असे या आमदाराचे नाव आहे.
कर्नाटक विधानसभेतील बहुमत चाचणीला अवघे काही तासच उरले आहेत. शपथ घेण्यासाठी सर्व पक्षांचे आमदार विधानसभेत पोहोचले. मात्र, काँग्रेसचे दोन आमदार अद्याप विधानसभेत पोहोचले नाहीत.तर भाजपाचे एक आमदार सोमशेखर रेड्डी  त्यामुळे ते बहुमत चाचणी  अजूनही बेपत्ता आहेत. वेळी मतदान करतील की नाही, याबाबत शंका आहे. भाजप आमच्या आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सर्वच पाहत आहेत’, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विरप्पा मोईली यांनी केला. आमच्या पक्षाचे सर्व आमदार पक्षालाच मतदान करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

*