कर्नाटक निवडणूक: काँग्रेसेची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

0
अहमदनगर(प्रतिनिधी) – भाजप देशातील व विविध राज्यातील सरकार हुकूमशाही पध्दतीने सरकार चालवत आहे. कनार्टक येथे राज्यपाल केंद्र सरकारच्या दबावाखाली येत मुख्यमंत्र्याचा शपथ विधी पार पडला आहे. हि बाबत असंविधानिक असून लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. यांच्या निषेधार्थ काँग्रेसपक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शन करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब भुजबळ, उबेद शेख, सचिन घोडके, शामराव वागस्कर ,सुनीता साळवी, रंजनी ताठे, गौरव ढोणे, बाळासाहेब भंडारी, आर .आर. पिल्ले, नलिनीताई गायकवाड, निजाम जहागीरदार, योगेश दीवाने, डॉ. जायदा शेख, रुपसिंग कदम, दिलीप सकट, मयूर पाटोळे जरीना शेख,यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते.

कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकीमध्ये काँग्रेस आणि जेडीएस या दोन्ही पक्षांनी मिळून बहुमताचा आकडा पार केला आहे. राज्यपालांनी केंद्र शासनाच्या दबावाखाली येत अल्प मतात असलेल्या भारतीय जनता पक्षाला सरकार बनविण्याची संधी देऊन दिली. यामुळे लोकशाहीचा व घटनेतील तरतुदींचा खून केलेला आहे.

मेघालय, मणिपूर व गोवा या राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला सर्वात जास्त जागा मिळालेल्या असतांनासुद्धा काँग्रेस पक्षाला सरकार बनविण्याची संधी नाकारण्यात आलेली होती. उलट कर्नाटक मध्ये मात्र राज्यपालांनी केंद्र शासनाच्या दबावाखाली येऊन मेघालय, मणिपूर व गोवा या राज्यांच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध भूमिका घेतलेली आहे. सदर बाबत अत्यंत चुकीची व लोकशाहीचा गळा दाबणारी आहे. यामुळे अल्प मतात असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथ विधी पार पडलेला आहे. ही बाब अत्यंत असंविधानिक असून लोकशाहीच्या तत्वाला काळिमा फासणारी आहे. भारतीय जनता पक्ष व केंद्र शासन देशाला हुकूमशाहीकडे नेत आहे असे दिसून येते व ही बाब अत्यंत चुकीची आहे. ज्यापद्धतीने भाजप देशातील व राज्यांतील सरकार हुकूमशाही पद्धतीने चालवीत असल्याचा आरोप प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*