कर्नाटक निवडणूक: काँग्रेसचा आज देशभर ‘लोकशाही बचाव दिन’

0
नवी दिल्ली : कर्नाटक निडवणुकांचा निकाल जाहीर झाला व सत्ता स्थापनेचा वादाला सुरुवात झाली. बहुमत नसताना देखील भाजपने सत्ता स्थापनेचा दावा करत येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान केले. या विरोधात काँग्रेसने निदर्शने सुरु केली आहे. देशातील १३२ कोटी नागरिकांची लोकशाही मूल्ये आणि अधिकारांना वाचवण्यासाठी आज, १८ मे रोजी काँग्रेसने प्रत्येक जिल्ह्यामध्ये ‘लोकशाही बचाव दिन’ पाळण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचे स्पष्ट बहुमत नाकारून अल्पमतातील भाजपच्या येड्डीयुरप्पांना सरकार स्थापन करण्याच्या राज्यापाल वजुभाई वाला यांच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तबक केल्यानंतर आता न्यायालयाच्या या निवाड्याच्या आधारे गोवा, मणिपूर, मेघालय आणि बिहार या चारही राज्यांच्या राज्यपालांवर दबाव आणण्याचे डावपेच काँग्रेसने आखले आहेत.

कर्नाटकमध्ये एका बाजूला आमदार व दुसरीकडे राज्यपाल अशी परिस्थिती निर्माण असल्याचे ते म्हणाले. भाजपाकडून पोकळ विजयाचा आनंद साजरा केला जात असून प्रत्यक्षात देशभरात लोकशाहीचा पराभव झाल्याबद्दल दु:ख व्यक्त केले जात आहे, असे टिष्ट्वटही त्यांनी केले. कर्नाटकातील घटनांच्या निषेधार्थ काँग्रेसने आज देशभर लोकशाही बचाव दिन पाळण्याचे ठरवले आहे. दिल्ली तसेच देशातील सर्व शहरांमध्ये काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते धरणे, मोर्चे व आंदोलन करून, हा दिवस पाळणार आहेत.

LEAVE A REPLY

*