कर्नाटक निवडणूक : घोडेबाजारीसाठी काँग्रेस प्रसिद्ध आहे- भाजपकडून प्रत्युत्तर

0
बंगळुरू: कर्नाटक निवडणुकांमध्ये बहुमत न मिळाल्याने सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप व काँग्रेस दोघांनी देखील युद्धपातळीवर हालचाली सुरु केल्या आहेत. आमदारांना गळाला लावण्यासाठी भाजपने १०० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा जेडीएस आणि काँग्रेसने केलेला आरोप भाजपने फेटाळून लावला आहे. तसेच भाजपवर केलेले आरोपांमध्ये काही तथ्य नसल्याचे शप्ष्टीकरण प्रकाश जावडेकर यांनी दिले आहे. तसेच यावेळी काँग्रेसवर पलटवार करताना ते म्हणाले कि, घोडेबाजारीसाठी काँग्रेस प्रसिद्ध आहे.

कर्नाटकात भाजपने आमदारांना गळाला लावण्यासाठी १०० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप काँग्रेस आणि जेडीएसने केला होता. यामुळे खळबळ उडाली होती. या आरोपांना भाजपचे कर्नाटकातील प्रभारी प्रकाश जावडेकर यांनी उत्तर दिले आहे. भाजपने त्यांच्या आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच त्यांना कोणतीही ऑफर दिलेली नाही. आरोप करणारा काँग्रेस पक्ष घोडेबाजारीसाठी प्रसिद्ध आहे, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

*