Type to search

कर्मयोगिनी- (अ‍ॅड. निर्मला चौधरी) अन्यायग्रस्त महिलांना न्यायाधार देणार्‍या अ‍ॅड. निर्मलाताई

Karmayogini सार्वमत

कर्मयोगिनी- (अ‍ॅड. निर्मला चौधरी) अन्यायग्रस्त महिलांना न्यायाधार देणार्‍या अ‍ॅड. निर्मलाताई

Share

अ‍ॅड. निर्मला चौधरी

  • गट- विधी व न्याय
  • शिक्षण : बी. ए. एल. एल. बी.
  • ‘एडीआरएस’ आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम
  • अध्यक्षा, न्यायाधार संस्था
अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या असंख्य कर्तृत्वान महिलांना कर्मयोगिनी संबोधण्यात येते. या महिलांनी एका ध्येयासाठी आयुष्यभर लढा देत समाजातील महिलांच्या उन्नतीचे कार्य केले. हा आदर्श झोळ्यासमोर ठेवून महिला वकील म्हणून काम करण्याचा निश्‍चय अ‍ॅड. निर्मला चौधरी यांनी केला आहे. अ‍ॅड. चौधरी माहेरी असतांना त्यांच्या गावात महिला वकील म्हणून पास होणार्‍या त्या पहिल्या ठरल्या. यामुळे त्यांची जबाबदारी वाढली होती. हे करत असतांना गावात भांडणे, कौटुंबिक कलह झाल्यास त्यातून मार्ग काढताना सत्याची कास धरणे किती अवघड आहे, हे अनुभवले.

अ‍ॅड. निर्मला चौधरी यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे आई, वडील अशिक्षित होते. वडिलांना शाहिरी व समाज प्रबोधनाची आवड असल्याने वडिलोपार्जित शेतजमीन आई यांनाच वहित करण्याची वेळ आली. असे असले तरी शिक्षणाचा ध्यास व गरज ओळखून अ‍ॅड. चौधरी यांनी भावाबरोबर शिक्षण घेतले. त्यांच्या घरात सात भावंडे होती. वडील कम्युनिस्ट पक्षात कामगारांच्या प्रश्‍नावर गीते गात शाहिरी करत असत. त्यावेळी खेड्यापाड्यांतील गरीब लोकांना कशाची गरज आहे,. हे वडिलांनी ओळखले. आपल्या खेडेगावाला एक डॉक्टर व एक वकिलाची आवश्यकता आहे. म्हणून वडिलांनी मोठा भाऊ डॉ. अरुण गोरे यांना डॉक्टर केले. अ‍ॅड. चौधरी यांना वकिलीपर्यंत शिक्षण घेऊन देत त्यांना महिला वकील म्हणून स्वत:च्या पायावर उभे केले. तसेच दोघा भाऊबहिणीकडून समाजाची सेवा करण्याची अपेक्षा शेवटपर्यंत ठेवली.

अ‍ॅड. चौधरी 1989 मध्ये वकिल बनल्यानंतर त्याचा विवाह झाला. संसार व वकिली बरोबरच सुरू होती. वकिली करत असताना त्यांच्या सोबत अन्य सहा वकील मैत्रिणी काम संपल्यानंतर गप्पा मारत बसत असत. त्यावेळी त्यांच्या जवळ असणार्‍या महिला पक्षकार प्रश्‍न विचारत. माझी केस जिंकणार? माझा अन्नवस्त्राचा प्रश्‍न कायमचा सुटेल? न्यायालयात न्याय मागितला तर मिळतो? माझा नवरा माला परत नांदण्यास घेऊन जाईल? न्यायालयामधून मला खरोखरच न्याय मिळेल? असे प्रश्‍न त्यांचे असत. हे विचारताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत. त्यामुळे अ‍ॅड. चौधरी यांना व त्यांच्या मैत्रिणी असणार्‍या वकिलांना सतत गरजवंताना मदत करण्याची इच्छा होत असे. परंतु कशी करायची मदत़? आम्ही ग्रामीण भागातून आलेलो.

तेथे कुणी शाळा बांधायला जागा दिली, कुणी दगड-माती, सिमेंट दिले. त्या शाळेतून आम्ही शिकलेलो. यामुळे आम्ही देखील समाजाचे देणे लागतो, ही भावना कायम असे. एलएलबी शिक्षणाचा उपयोग स्त्रियांना झालाच पाहिजे. महिलांना मदतीसाठी, महिला व बालकांची उपासमार थांबविणे, विवाहित महिलांना नांदण्यास पाठविता यावे, या महिला सुरक्षित राहाव्यात म्हणून 2004 ला महिला समुपदेशन केंद्र सुरू केले. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तडजोडी झाल्या. महिला पुन्हा स्वत:च्या सासरी मुलांसह नोंदण्यास जाऊ लागल्या, याचा मोठा आनंद होत होता.

महिलांना न्यायाधारची मदत होत होती. कुटुंब व्यवस्था स्थिर होत होती. कुंटुंबाला वाचविण्याचे, भांडणे, वाद, आत्महत्या या विचारांपासून त्या दूर होत होते. आनंदी होऊन अनेक कुटुंबे समस्यांपासून वाचत होते. दरम्यान, महिला बाल विकास विभागामार्फत पोलीस अधीक्षक कार्यालय येथे महिला आयोगाचे न्यायाधार संस्थेमार्फत जून 2010 मध्ये केंद्र सुरू झाले. त्या ठिकाणी महिलांना कायदेशीर मदत दिली जाऊ लागली. न्यायालयात सुरू असणार्‍या भादवि कलम 498 खटल्यात कोर्टाकडून या महिलांना कशा प्रकारे मदत मिळवून देता येईल, याचा अभ्यास आणि संशोधन करण्यात आले. यासाठी महिला आयोग ते मुख्य न्यायामूर्ती, विधी व न्याय विभागाचे सचिव यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार, निवेदनाद्वारे मागण्या करण्यात आल्या. समाजातील या महिलांना न्याय मिळवून देण्याचा ध्यास घेतलाच होता. त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले.

अहमदनगरमध्ये वकील म्हणून काम करताना खूप अनुभव आले. समाजाला महिला वकिलांची किती गरज आहे, हे समोर आले. सतत 14 वर्षे वकिली केल्यावर आपण एकट्या महिला कोणतेही सामाजिक परिवर्तन पूर्णत्वास नेण्यास अडचणीचे ठरते, हे लक्षात आले. त्यामुळे वकील महिलांना एकत्रित करून गरजू पीडित महिला आणि बालकांना मदत करण्यासाठी अ‍ॅड़. चौधरी यांनी न्यायाधार ही संस्था स्थापन केली. त्याव्दारे अनेक प्रश्‍न सोप्या पद्धतीने आणि एकजुटीच्या जोरावर मार्गी लावले आहेत.

नगरला सुरू झालेल्या न्यायाधार केंद्रात आजपर्यंत सात हजार 395 महिला व बालकांना मदत दिली. कायदेशीर मदत व तडजोड करून प्रश्‍न सोडविले. काही महिलांचे प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. न्यायाधारमध्ये संघटित महिला व मुलांना न्यायालयात वकिलांची मोफत मदत दिली जाते. काटुंंबिक समस्यांबाबत समुपदेशन व कायदेविषयक जागृती करण्यात येते. अन्यायग्रस्त महिलांच्या संदर्भात कायद्याचे संशोधन केले जाते. संस्थेच्या पाठपुराव्यामुळे सरकारी वकिलांना आचारसंहिता लागू झाली. लिंगभेद समूळ नष्ट करण्यासाठी उच्च न्यायालयापर्यंत लढा देण्यात आला. गेल्या 10 वर्षांत संस्थेकडे राज्यातील एक हजार 658 महिलांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी 645 महिलांचे संसार पुन्हा सुरळीत उभे राहिले आहेत. न्यायालयात दाखल खटल्यापैकी 115 महिलांना कायदेशीर सल्ला दिला असल्याचे अ‍ॅड. चौधरी यांनी सांगतात.

कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी यासह महिलांच्या संदर्भातील गुन्हे व खटल्यांचा अभ्यास व संशोधन करून त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी महिला आयोगाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. अ‍ॅड. चौधरी यांनी न्यायाधारच्या माध्यमातून शेकडो महिलांना दैनदिन कलह व समस्यांबाबत मार्गदर्शन केले. समुपदेशनाद्वारे 942 महिलांचे कौंटुंबिक कलह मिटवलेले आहेत. यापुढेही महिलांसाठी सतत कार्यरत राहण्याचा त्यांचा निर्धार आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!