Type to search

कर्मयोगिनी- (कविता नावंदे-निंबाळकर) युवती, महिलांना घडविणारी स्वयंसिद्धा

Karmayogini सार्वमत

कर्मयोगिनी- (कविता नावंदे-निंबाळकर) युवती, महिलांना घडविणारी स्वयंसिद्धा

Share

कविता नावंदे-निंबाळकर

 • गट-प्रशासकीय
 • शिक्षण – बी. कॉम., एम. कॉम., बीपीएड, एनआयसी
 • जिल्हा क्रीडा अधिकारी, अहमदनगर
 • ज्युदोच्या सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक
 • मिळालेले पुरस्कार
 • 1990 चित्रपट अभिनेत्या आशालता वडगावकर यांच्या हस्ते सुवर्णपदक
 • 1991 मध्ये कुलगुरू डॉ. शिवाजीराव भोसले आणि नागनाथ कोत्तापल्ले यांच्याकडून पुरस्काराने सन्मानित.
 • 2000 आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये उत्तम प्रशिक्षिक म्हणून गौरव.
 • 2001 क्रीडा प्रबोधिनी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षक पुरस्कार
 • 2006 ला क्रीडा संचालकांच्या वतीने सन्मानपत्र
 • राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट स्पर्धाप्रमुख पुरस्कार प्रदान
 • बोउन्डलेस स्पोर्ट्स असोसिएशन पुणे यांच्या वतीने उत्कृष्ट महिला मार्शल आर्ट पुरस्कार
 • मुस्लीम मुलींना आत्मरक्षणाचे धडे दिले त्याबद्दल भाईचारा पुरस्कार
धाडस आणि जिद्द या दोन शब्दांना साजेसा दुसरा शब्द म्हटला तर कविता नावंदे असे म्हटले तर वावगे ठरू नये. अथक परिश्रमातून त्यांनी आपले जगणे सुंदर केले. यशोशिखराकडे वाटचाल करताना अनेक आव्हानं पेलावी लागली. परंतु या आव्हानांना भीक न घालता त्यांनी असंख्य खेळाडूंना, स्वयंसिद्धा युवतींना व युवकांना घडविले. यातूनच त्यांनी नकळतच सामान्यांतून असमान्य होण्याचे वलय प्राप्त केले.

बीड जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षण घेताना कविता खेळ विषयक सर्व उपक्रमात पुढकार घ्यायच्या. त्या काळातील त्यांची चिकित्सक वृत्ती खेळाची पदवी उकृष्ट श्रेणीमध्ये संपादित करण्यात महत्वाची ठरली. 1994 साली त्या शारीरिक शिक्षणातलीच पदव्युत्तर पदवी प्राप्त करून औरंगाबाद येथे शारीरिक शिक्षणाचे इत्यंभूत धडे गिरवले. क्रीडा क्षेत्रात त्यांनी ज्युदोेला प्राधान्य दिले. 1995 ते 1997 मध्ये पंजाब राज्यातील पटियाळा येथील राष्ट्रीय ज्युदो प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांची निवड झाली.

तिथेच ज्युदो सारख्या विशेष क्षेत्रात प्रावीण्यासह एनआयएसची पदवी संपादन केली. कोलकाता व पटियाळा अशा दोन ठिकाणी पूर्ण प्रशिक्षण घेऊन दोन वर्षाची पदवी संपादन करणार्‍या त्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील पहिल्या महिला आहेत. 1998 ला शासन सेवेत क्रीडा मार्गदर्शक म्हणून रुजू झाल्या, तेही राज्यात पहिल्या महिला मार्शल आर्ट मार्गदर्शिका म्हणूनच. ज्युदोमधील त्यांची डावपेच शिकविण्याची शैली अद्वितीय होती. तासनतास सरावाने ज्युदोचे कौशल्य आत्मसात केले होते. या खेळाचा इतरांना लाभ व्हावा म्हणून त्यांनी ज्युदो प्रशिक्षण केंद्र सुरू केले. या केंद्राचे काम कधी राहत्या ठिकाणी, कधी नगरपालिकेच्या बागेत तर कधी बांधकामासाठी आजूबाजूला येऊन पडलेल्या वाळूच्या ढिगार्‍यात चालत असे. त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतलेले अनेक खेळाडू राज्य, राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळवू लागले. अनेक खेळाडूंनी ज्युदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने ज्युदो ब्लॅक बेल्ट मिळविला.

2002 साली क्रीडा प्रबोधिनीच्या अतिउच्च प्रशिक्षक म्हणून राज्यात गणना होत असताना राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य प्राप्त खेळाडूंना तुमचे प्रशिक्षक स्वतः ब्लॅक बेल्ट नाहीत, असे हिणवले जाऊ लागले. हे त्यांच्या लक्षात येताच ज्युदो (ज्युदो फेडरेशन ऑफ इंडिया), कराटे, तायक्वांदो (वर्ल्ड हेड क्यूट टीएफआय), हापकिडो, कोरिया-टायगर टीममध्ये हाफकिडो मार्शल आर्टचे धडे घेतले. कुंगफूतही तरबेज होत या सर्व खेळात बल्ॅक बेल्ट मिळवून समोरच्याला चपराक दिली. आज भारतातून एकमेव असे 5 मार्शल आर्ट मधील ब्लॅकबेल्ट पदवीधारिका आहे. 2006 ला स्वयंसिद्धाच्या राज्य नियंत्रकपदी कार्यरत असताना स्वयंसिद्धा या अभियानांतर्गत त्यांनी राज्यातील 35 पैकी 31 जिल्ह्यांत आणि 358 पैकी 271 तालुक्यांत स्वयंसिद्धाचे व्यापक जाळे उभारले आहे.

अनेक महिला युवती व बालिकांचे आधारस्तंभ म्हणून त्या मागे उभे असतात. रत्नागिरी, अमरावती, नंदूरबार येथे त्यांनी खास उल्लेखनीय कार्य केले. राज्यात आजवर अडीच लाख मुलींना त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. दोन हजार मास्टर्सना मार्गदर्शन केले आहे. 1994,1997 ते 2006 सालच्या शालेय क्रीडा स्पर्धेत दिल्ली येथे शासनाच्या ज्युदो प्रशिक्षक म्हणून महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करीत त्यांनी मार्गदर्शिका व कधी पंच अशी भूमिका बजावली.

1990 साली संमेलनात सलग तीन वर्षे सतत सर्वोत्तम अभिनय व नृत्य सादरीकरणासाठी मराठवाडा विद्यापीठांतर्गत चित्रपट अभिनेत्या श्रीमती आशालता वाबगावकर यांच्या हस्ते सुवर्ण पदक प्रदान मिळाले. 1991 मध्ये 136 महाविद्यालयांतून विद्यापीठाची महिला प्रतिनिधी म्हणून निवडून येण्याचा बहुमान त्यांना मिळाला. याबद्दल त्यांना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव भोसले आणि डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी सन्मानित केले. एनआयएस मधून पहिली ज्युदोे डिप्लोमा पूर्ण करणारी महिला भारतीय म्हणून औरंगाबाद महानगरपालिकेने त्यांचा नागरी सत्कार केला. रशियन आंतरराष्ट्रीय खेळातील पदक विजेत्या सुनीता पाटील हिची कोच म्हणून कविता यांचा सांगली येथे 2000 साली (स्व.) पतंगराव कदम यांच्या हस्ते नागरी सत्कार झाला. 2000 सालीच आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये उत्तम प्रशिक्षिक म्हणून कामगिरी केल्याबद्दल मेजर ध्यानचंद स्मतिदिनी सिंबायोसिस विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. मुजुमदार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

क्रीडा प्रबोधिनी पुणे यांचा सर्वोकृष्ट क्रीडा प्रशिक्षण पुरस्कार 26 जानेवारी 2001 साली कविता यांना मिळाला. सर्वोकृष्ट क्रीडा प्रशिक्षक पुरस्कार पुणे महानगरपालिकेच्या वतीने 29 ऑगस्ट 2003 साली गौरविले. 26 जून 2006 साली महाराष्ट्रातील सर्व जिल्हा स्वयंसिद्धा कॅम्प उत्कृष्ट पद्धतीने पार पाडल्याबद्दल क्रीडा संचालकांनीे सन्मानपत्र दिले. 4 ऑक्टोबर 2006 साली महाराष्ट्रातील तालुकास्तरीय स्वयंसिद्ध कॅम्प उत्कृष्ट पद्धतीने पार पाडल्याबद्दल क्रीडा संचालकांच्या वतीने सन्मानपत्र मिळाले. सार्वोकृष्ट ज्युदो प्रशिक्षक आणि 2006 साली चेन्नई येथील राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळवल्याबद्दल क्रीडा संचालकांच्या वतीने गौरवपत्र बहाल करण्यात आले.

राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट (टूर्नामेंट डायरेक्टर) स्पर्धा प्रमुख पुरस्कार. राष्ट्रीय पातळीवरील डायनामिक नेतृत्व प्रमुख म्हणून 26 डिसेंबर 2006 रोजी स्कूल फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने गौरवपत्र. बोउन्डलेस स्पोर्टेस असोसिएशन पुणे यांच्यावतीने उत्कृष्ट महिला मार्शल आर्ट म्हणून 2007 च्या जागतिक महिला दिनी पुरस्कारीत. नक्षत्र असोसिएशन सातारा यांच्या वतीने उत्कृष्ट महिला (क्रीडा क्षेत्र), आकुर्डी, सांगवी, पिंपरी चिंचवड, पौड, निगडी वारजे या ठिकाणी झालेल्या स्वयंसिद्धा कॅम्पच्या उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून पुणे शिक्षण मंडळातर्फे गौरव, मुस्लीम मुलींना स्वयंसिद्धा अभियानातून आत्मरक्षणाचे धडे दिले. त्याबद्दल भाईचारा पुरस्कार, अलिबाग महिला प्रशिक्षण केंद्रात महिला पोलिसांना एक दिवसीय कार्यशाळेत प्रशिक्षण दिल्याबद्दल गौरव असे विविध पुरस्कार, सन्मानपत्र आणि गौरवाच्या त्या मानकरी ठरल्या.

आपल्या कारकिर्दीत कविता यांनी असंख्य जबाबदार्‍या पार पाडल्या. तब्बल अठरा वर्षाहून अधिक काळ त्या महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा प्रबोधिनी-ज्युदो मार्गदर्शिका म्हणून कार्यरत होत्या. सांगली क्रीडा प्रबोधिनी वसतिगृह प्रमुख, दिल्ली, चंदिगड, मिझोरम, केरल, पंजाब, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, गोवा, हिमाचल असे अनेक राष्ट्रीय स्पर्धाच्या प्रशिक्षक, कोचिंग विंग ऑफिसर म्हणून त्यांनी भूमिका बजावल्या. राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा प्रमुख, राष्ट्रीय संघ व्यवस्थापक, ज्युदो, कराटे, तायक्वांदो, हाफकिडो या खेळांबरोबरच त्यांनी एरोबिक, योगा, हास्य व्यायाम प्रकाराच्या तज्ज्ञ म्हणून काम केले. अत्यंत कमी वयात कविता यांना खेळ क्षेत्रातला सर्वोच्च अनुभव मिळवला. त्या अनुभवाच्या बळावर त्यांनी समाजातल्या असक्षम स्त्रियांना सक्षम बनविले.

क्रिडा क्षेत्रातील तांत्रिक, शास्त्रशद्ध व इत्यंभूत माहिती आज त्यांच्याकडे उपलब्ध आहे. त्या वर्ग 1 च्या आधिकारी थेट सेवेच्या माध्यमातून सहायक संचालक या पदी रूजू होणार्‍या पहिल्या अधिकारी आहेत. त्यांनी अवघ्या कार्यालयाचे बालेवाडीत स्थलांतर, युवा धोरण, साहसी खेळ क्रीडा धोरण या बाबतीत मोलाचे कार्य केले. अवघ्या दोन वर्षात महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा मंत्रालयाच्या विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली. तेथेही त्यांनी आपल्या कामाचा कुशलतेने ठसा उमटविला. सध्या त्या नगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी पदावर कार्यरत आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!