Type to search

कर्मयोगिनी- (डॉ. शीला संजय पठारे) आशेचा किरण जागविणार्‍या डॉक्टर

Karmayogini सार्वमत

कर्मयोगिनी- (डॉ. शीला संजय पठारे) आशेचा किरण जागविणार्‍या डॉक्टर

Share

डॉ. शीला संजय पठारे

  • गट-वैद्यकीय
  • शिक्षण – एमबीबीएस
  • चितळी रोड, राहाता, जि. अहमदनगर
लग्न होऊन अनेक वर्षे झालीत परंतु मूल पदरात पडले नाही म्हणून अनेक विवाहित जोडपे आपल्या जीवनात खूपच निराश आणि दुःखी असतात. अशा जोडप्यांच्या जीवनात खरा आनंद देण्याचे काम राहाता शहरात गेल्या 20 वर्षांपासून करणार्‍या एका सामान्य शेतकरी कुटुंबातील डॉ. शीला संजय पठारेे यांनी सुरू केले आहे. आजपर्यंत कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया न करता केवळ औषधोपचाराने महिलांच्या पदरात मूल होण्याचे सुख त्यांनी टाकले आहे.

लहानपणापासूनच डॉक्टर होण्याची अपेक्षा बाळणार्‍या एक गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. शीला संजय पठारे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील एम. बी. बी. एस. ही पदवी प्राप्त करून गेल्या 20 वर्षांपासून या वैद्यकीय क्षेत्रात आपल्या स्वतःला वाहून घेतले आहे. डॉ. शीला पठारे यांचे माहेर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील आहे. वडील सैन्यात होते. ते निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शेती करण्यास सुरुवात केली. डॉ. शीला यांचे प्राथमिक शिक्षण श्रीगोंद्यातच झाले. सातवी ते आठवी इयत्तेत असतानाच डॉक्टर व्हायचे अशी मनापासून इच्छा होती. आणि ही इच्छा त्यांनी त्यांच्या वडिलांना बोलूनही दाखविली.

त्यानुसार जिद्दीने अभ्यास करत धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेऊन या 1998 साली या क्षेत्रातील एम. बी. बी. एस. ही पदवी प्राप्त केली. त्याचवर्षी राहाता येथील डॉ. संजय पठारे यांच्याशी लग्नही झाले. त्यानंतर चाळीसगाव येथे बाबजी हॉस्पिटल येथे प्रॅक्टीससाठी गेल्या. त्याठिकाणी मेडिकल ऑफिसर म्हणून काम पाहिले. त्या ठिकाणचा अनुभव घेऊन राहाता येथे स्वतःचे हॉस्पिटल उभारून प्रॅक्टीस सुरू केली. माहेरची परिस्थितीही जेमतेम होती. सासरकडेही एक गरीब शेतकरी कुटुंब होते. माझे पती व मी आम्ही दोघेही वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळे आम्हाला अशा प्रकारची वैद्यकीय सेवा देत असताना कोणतीही अडचण आली नाही. माझे पती डॉ. संजय पठारे हे एम. डी. असून गेल्या तीन वर्षापासून रुबी हॉल येथे ते सेवेत आहेत. या अगोदर 15 वर्षे ते राहाता येथेच वैद्यकीय सेवा देत होते. एक मुलगा असून आमचे कुटुंब अगदी सुखी आहे.

लग्नाला अनेक वर्षे होऊनही मूल होत नाही म्हणून भाऊ आणि भावजय नेहमीच नाराज व दुःखी असत. त्यांचे दुःख मला पाहवत नव्हते. त्यांना मूल का होत नाही, यावर मी विचार करण्यास सुरुवात केली. मूल का होत नाही? मूल न होण्याची कारणे काय? यावर अभ्यास सुरु केला. यासाठी असलेल्या वेगवेगळ्या गोळ्यांचे डोस देऊन एकेक असे प्रयोग करण्यास सुरुवात केली. यासाठी कोणत्या गोळ्यांचा प्रभाव अधिक होतो हे पाहून मला यात यश आले. या सर्व गोळ्यांचा एक फॉर्म्युला तयार केला आणि 10 दिवसांत हा प्रयोग यशस्वी केला आणि भावजयीला गर्भधारणा राहिली.

कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया न करता, यावर अफाट पैसा न खर्च करता केवळ औषधोपचाराने माफक दरात महिलेस गर्भधारणा कशी राहील अशी वैद्यकीय सेवा करण्यास प्रारंभ केला. आणि यात मला यशही आले. कमी खर्चात आणि हमखास खात्री यामुळे दहा ते बारा वर्षे लग्नाला होऊनही पदरी निराशा आलेले पुणे, बारामती, उस्मानाबाद, नाशिक, चंद्रपूर, जळगावसह राज्य आणि परराज्यांतून असे जोडपे माझ्याकडे उपचारासाठी येऊ लागले. त्यांना यावर उपचार म्हणून गोळ्या देत गेले. अशा जोडप्यांंना केवळ कमीत कमी पंधरा दिवस व जास्तीतजास्त एक ते दोन महिन्याच्या आतच गुण येत गेले.

माझी रुमपार्टनर असलेली जोधपूर येथील मैत्रीण तिला लग्न होऊन अनेक वर्षे झाली परंतु मूल होत नव्हते. तिला मी येथे बोलावून घेऊन तिला औषधे दिली. थोड्याच दिवसात तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. आतापर्यंत अनेक वर्षे लग्न होऊन मूल होत नसल्याने निराश झालेल्या एक हजाराहून अधिक महिलांच्या पदरी संतती प्राप्तीचे सुख देण्याची सेवा माझ्या हातून झाली. त्यांच्या जीवनात आनंद दिला हीच माझी सर्वात मोठी समाजसेवा मी समजते. माझ्याकडे असा निराश झालेला रुग्ण आल्यास त्याला चांगली सेवा देणे हे मी आद्य कर्तव्य समजते.

तिच्यावर उपचार करताना गर्भाशयाला कोणतीही इजा पोहचू नये किंवा गर्भ राहतांना कोणतीही अडचण येऊ नये तसेच गर्भातील बाळाला कोणत्याही प्रकारचे व्यंग होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाते. दैनिक सार्वमत-नजराणा महिला मंचच्या माध्यमातून मी अनेक ठिकाणी आरोग्य शिबिरे घेतली. तसेच आता अनेक शाळा व महाविद्यालयांमध्ये या विषयावर व्याख्यान देण्यासाठीही जाते. माझ्याकडे असे निराश आणि दुःखी झालेल्या गरीब कुटुंबातील तसेच ग्रामीण भागातील महिलासाठी अधिक सेवारत आहे.

हजारो, लाखो रुपये खर्च करुन ज्यांना यश आले नाही असे रुग्णही माझ्याकडे येतात. हीच सेवा माझ्यासाठी सर्वात मोठी समाजसेवा असून यापुढेही मी अशाच पध्दतीने ही सेवा करत राहणार आहे. गरीब परिस्थितीतून आम्ही दोघांनीही स्वकष्टावर इथपर्यंत पोहोचलो असून निराश आणि दुःखी असणार्‍या अशा जोडप्यांच्या चेहर्‍यावर आनंद मिळवून देऊन अशी सेवा देण्यातच आमचे सुख असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!