अहमदनगर (कर्मयोगिनी) : अंकिता संतोष चोरडिया – धडाडीची तरुण लेखा परीक्षक

0

श्रीरामपूर
चार्टर्ड अकौंटंट
कार्य -सध्या शेती पुरक साहित्य बनविण्याच्या कारखान्यांचे चार्टर्ड अकौंटंट व तसेच अन्य दुकानांच्या लेखा परीक्षणाचे काम. गट : बँकींग

श्रीरामपूर सारख्या ग्रामीण पार्श्‍वभूमी असलेल्या शहरातील रयत शिक्षण संस्थेत विज्ञान शाखेत 11 वी, 12 वी केल्यानंतर अंकीताने वाणिज्य क्षेत्रात जाण्याचे धाडस दाखविले. वाणिज्य शाखेतून फक्त सी. ए. होता येते, एवढाच यामागील हेतू नव्हता. तर क्षेत्र कोणतेही असो यश साध्य करता येते, हे अंकीताने मनाशी निश्‍चित केले होते. करिअरबाबत पारंपरिक मार्गांना छेद देण्याचे धाडस दाखवत ती आर्थिक क्षेत्रात मुसाफिरी करण्यास सज्ज झाली आहे. वेगळ्या वाटा निवडण्याच्या विचारात असलेल्या युवतींसाठी अंकीता या उत्तम उदाहरण ठरतील.

शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याचे अनेक जणांचे स्वप्न. परंतु पारंपारिक पध्दतीने मार्ग सोडून नवीन मार्ग अनुसरून यश मिळवणारे अत्यंत कमी आणि म्हणूनच सी. ए. सारख्या परीक्षेत आपल्या कर्तृत्वाने पास होऊन ग्रामीण युवतीसाठी आदर्श घालण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीही झाला. दहावी बारावी झाल्यानंतर काय करावे हे आताच्या विद्यार्थ्यांना कळत नाही. त्यावेळची शैक्षणिक अवस्था वेगळ्या वळणावर असते. परंतु पहिल्यापासून ठरवलेले ध्येय अंगी बाळगले की, नवीन वळणावरही काहीच अडचण येत नाही हे मला सी. ए. उत्तीर्ण झाल्यावर कळून आले. सी. ए. झाल्यानंतर माझ्या जीवनातील आनंदच वेगळा होता.

श्रीरामपूरच्या रयत शिक्षण संस्थेतच विज्ञान शाखेत 12 वी करून देखील आपल्या धेय्यावर अढळ निष्ठा ठेवून विद्यार्थ्यांच्या मनात असणारे वाणिज्य शाखेतून फक्त सी. ए. होता येते या पारंपारिक विचारसरणीला छेद देत श्रीरामपूरचे नाव जिल्ह्यात नव्हे तर राज्यात नेऊन अंकिताने हे सिध्द केले की, आम्ही खरंच सावित्रीच्या लेकी आहोत. जीवनात यशस्वी होण्यासाठी आपले ध्येय हे आईवडिलांच्या आवडीनुसार नाही तर स्वत:च्या आवडीनुसार ठरवावे. जेणेकरून आई-वडिलांचे दडपण नसते तर एक नैतिक दडपणातून आपले ध्येय साकार करण्याची प्रेरणा मिळतेे असे अंकिता सांगते.

माझे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे श्रीरामपुरात झाले. गणिताची आवड हे तिला तिचे आजोबा स्व. उत्तमचंद चोरडिया यांच्यापासून निर्माण झाली कारण गणित म्हणजे एक खेळ जो खेळ म्हणून खेळला तर ते सहज सोपे होते. या संस्कारातून वाढलेल्या असल्यामुळे कोणतीही अडचण जाणवली नाही. मी सी. ए. ची परीक्षा दिली आणि यानंतर आपले काय? असा प्रश्‍न निकाल लागेपर्यंत सतावतच राहिला. परंतु ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी तर सगळेच चकितच झाले. नाशिक विभागात तिसरा क्रमांक मिळविला तर जिल्ह्यात मुलींमध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यावेळी तर आजी, आई, वडील, मोठे काका, काकू व भावंडाच्या डोळ्यात तर आनंदाश्रूच आले. आई वडिलांचे अशिर्वादाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य होत नाही. मी चांगल्या गुणांनी यशस्वी झाल्याचे आमच्या समाजात समजल्यानंतर समाजानेही माझ्या यशाला कौतुकाची थाप दिली.

एवढेच नव्हे सर्व समाजातील माझ्या वडिलांच्या मित्रांनीही माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यशस्वी झाल्यानंतर अनेक सत्कार समारंभ झाले परंतु अपयश आल्यावर ढासळून न देता पुन्हा भरारी घेण्यास बळ देणेे कुटुंबीयांवर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असते. म्हणून प्रथम कुटुंबावर विश्‍वास ठेवा यश निश्‍चित मिळते असे अंकिता सांगते. सामाजिक सेवेचा वारसा माझ्या व्यवसायाबरोबर मला पुढे न्यायचा आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना करिअर करायचे आहे. त्यासाठी एक मैत्रिण म्हणून ती नेहमी तयार असते. विद्यार्थ्यांनी भविष्यात काय करायचे हे ठरवून त्यादृष्टीने वाटचालीला सुरूवात केल्यास येणार्‍या अडचणींवर मात करणे सोपे होते.

पालकांच्या सोबतीने मार्गक्रमण केले तर अडचणींची तीव्रता कमी भासेल. स्वतःच्या मेहनतीवर आणि जिद्दीवर विश्‍वास ठेवून अभ्यास करा यश निश्‍चित आपल्याकडेच खेचले जाते. असे तिने सांगितले आहे. श्रीरामपूर एमआयडीसीमध्ये शेतीपूरक वस्तुंचे कारखाने आहेत त्या कारखान्याच्या चार्टर्ड अकौंटंट म्हणून कारभार सध्या पहात आहेत. अंकिताच्या यशामध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा हा कुटुंबातील प्रत्येकाप्रमाणे योगेश साकला व नरेंद्र काळे या गुरूंचा मोलाची वाटा आहे. विशाल वाणी, विकास सुराणा यांचे अनमोल मार्गदर्शन मिळाले. ज्यांच्यामुळे मी हे यशाचे हे अवघड शिखर गाठू शकले असे उद्गार आपल्या गुरुबद्दल अंकिता मोठ्या आदराने काढते.

LEAVE A REPLY

*