#GUCCI : करीनाचा ‘मेड इन इटली’ शर्ट!

0

बॉलिवूड कलाकारांच्या लाइफस्टाइलची नेहमीच चर्चा असते. महागड्या ब्रॅण्डचे कपडे, फोन्स, शूज, पर्स, स्कार्फ इ. गोष्टींची नेहमीच सोशल मीडियात एकतर चर्चा होती नाहीतर कलाकार ट्रोल होतात.

या सेलिब्रिटींच्या कपड्यांच्या किंमतीच ऐकून घाबरायला होते. मग त्यांच्याप्रमाणे स्टाइल करणं तर दूरच राहिले.

करिना कपूर खान ही नेहमीच तिच्या स्टाइल स्टेटमेण्टसाठी ओळखली जाते.

नुकतीच ती एका पार्टीला गेली होती. यावेळी तिने पिवळ्या रंगाच्या शर्टवर गुलाबी स्कार्फ घेतला होता. तसं बघायला गेलं तर हा शर्ट अगदी साधा वाटत होता. पण बेबोने तो घातला आहे म्हटल्यावर चर्चा तर होणार….

करिनाने घातलेल्या गुची ब्रॅण्डच्या या शर्टची किंमत तब्बल 57 हजार रुपये आहे. हा सिल्क शर्ट ‘मेड इन इटली’ आहे.

LEAVE A REPLY

*