येडियुरप्पांच्या मुख्यमंत्रीपदाचा आज निर्णय; खुर्ची राहणार कि जाणार ?

0
बेंगळूर : कर्नाटक निवडणूक पार पडल्या व सत्ता स्थापनेवरून वादळाची परिस्थिती झाली होती. भाजपाने आघाडी घेत येडियुरप्पा मुखमंत्री पदावर विराजमान देखील झाले. येडियुरप्पा यांना बहुमत सिद्द करण्यास २४ तासाचा अवधी देण्यात आला आहे. आज सत्ता स्थापनेवरुन निर्माण झालेला पेच आज सुटण्याची शक्यता आहे. कारण यासंदर्भात सुप्रीम कोर्टात आज फैसला होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री येडियुरप्पा किती काळ खुर्चीवर विराजमान राहणार हे आज स्पष्ठ होणार आहे. यासंदर्भात आज सकाळी १०.३० वाजता कोर्टात सुनावणी होणार आहे.

बहुमताचे संख्याबळ असलेल्या जेडीएस-काँग्रेस आघाडीऐवजी सर्वाधिक आमदारांचे बळ असलेल्या भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करण्याच्या राज्यपाल वजुभाई वाला यांच्या निर्णयाला काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. बुधवारी रात्री काँग्रेस- जेडीएसने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचे रजिस्ट्रार कार्यालय गाठून तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. येडियुरप्पांना बहुमताचा आकडा दाखवणाऱ्या आमदारांच्या नावांची यादी सादर करण्याचे आदेश दिले होते. हीच यादी आज येडियुरप्पांना कोर्टात सादर करावी लागणार आहे. ही यादी जर ते सादर करु शकले नाहीत तर त्यांची सत्ता आणि मुख्यमंत्रीपद धोक्यात येऊ शकते.

आमदार स्थलांतरित
सत्ता स्थापनेचा वाद वाढला असून आमदार मिळविण्यासाठी पक्षांकडून प्रयत्न केले जात आहे. येडियुरप्पांना आज आमदारांच्या नावांसहित बहुमताचा आकडा सुप्रीम कोर्टात सांगावा लागणार आहे. त्यामुळे कर्नाटकात घोडेबाजार होण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी आपल्या आमदारांना भाजपाकडून पैशांचे आमिष दखवून खेरदी केले जाऊ नये यासाठी काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांना हैदराबाद आणि कोची येथे हालवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*