Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

करंजी घाटात ट्रकला अपघात

Share

करंजी- पाथर्डी तालुक्यातील करंजीघाट येथे मुंबईहुन परभणीकडे जात असलेल्या मालवाहू ट्रकला करंजी घाटातील धोकादायक वळणाजवळ पडलेला मोठा खड्डा चुकवताना अपघात झाला असून हा ट्रक रस्त्याच्या कडेच्या कठड्यावर जाऊन उलटला असुन या अपघातामध्ये ट्रक चालकासह क्लिनर जबर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे.

याबाबतची माहीती अशी की मुंबई येथून डाक पार्सल घेऊन परभणीकडे निघालेला ट्रक मंगळवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास करंजीघाट उतरत असताना एका धोकादायक वळणाजवळ पडलेला मोठा खड्डा चुकवताना या मालट्रकला अपघात होवून ट्रक धोकादायक वळणा जवळील कठड्यावर जाऊन आदळून उलटला या अपघातामध्ये ट्रकचालक गफूरखान पठाण व क्लीनर सगीर सय्यद दोघे राहणार परभणी हे या अपघातांमध्ये गंभीर जखमी झाले असून ट्रकचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!