कर्नाटक निवडणूक: उद्या बहुमत सिद्ध करू; येडियुरप्पा यांचा दावा

0

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक विधानसभेत उद्या-शनिवारी दुपारी ४ पर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर, भाजपाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. उद्या आम्ही बहुमत सिद्ध करू, असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी केला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भाजपा खरोखर बहुमत सिद्ध करू शकणार आहे का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तरीही भाजपा शक्ती प्रदर्शनासाठी तयार असल्याचं, प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.

कर्नाटकात सु्प्रीम कोर्टाच्या आदेशानुसार उद्याच बहुमत चाचणी होणार आहे. विशेष म्हणजे यासाठी गुप्त मतदान घ्या, असंही सर्वोच्च न्यायालयाने बजावलं आहे. कर्नाटकात येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. उद्या आम्ही बहुमत सिद्ध करू याचा आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे, असं येडियुरप्पा यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही बहुमत सिद्ध करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

आमदार संख्या
भाजपकडे 104 आमदार
काँग्रेसकडे 78 आमदार
जेडीएसकडे 38 आमदार
अपक्ष 2 आमदार
बहुमत गाठण्यासाठी ११२ आमदारांच्या पाठिंब्याची गरज

LEAVE A REPLY

*