LOADING

Type to search

करण जोहरच्या ‘कलंक’ चित्रपटाचा दमदार टीजर प्रदर्शित

मुख्य बातम्या हिट-चाट

करण जोहरच्या ‘कलंक’ चित्रपटाचा दमदार टीजर प्रदर्शित

Share
मुंबई – दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कलंक’ चित्रपटाची बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकही फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळते. नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आलाय. या टीजरमध्ये चित्रपटातील सर्व कलाकारांची दमदार झलक पाहायला मिळतेय.

‘कुछ रिश्ते कर्जों की तरह होते है, उन्हे निभाना नही चुकाना पडता है…’ अशा संवादाने ‘कलंक’ची ओळख होते. टीझर जसजसा पुढे जातो तसतशी कथानकाही झलक दाखवणाऱ्या या घडीचे एक एक पदर खुलत जातात. समोर येतात ते विविध आणि तितक्याच लक्षवेधी भूमिकांमध्ये झळकणारे कलाकार.

वरुण धवन, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, माधुरी दीक्षित अशा कलाकारांची झलक या टीझरमधून पाहायला मिळते. एक अनोखा काळ प्रेक्षकांच्या नजरेसमोर उभा राहतो. त्याला साथ मिळताना दिसते ती म्हणजे मोठे सेट आणि तितक्याच प्रभावी पार्श्वसंगीताची.

या चित्रपटात आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर आणि वरूण धवन यांच्यातील प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळायला मिळणार आहे. अभिषेक वर्मनने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाच्या टीजरवरून आता चाहत्यांची ट्रेलरबद्दलचीही उत्कंठा वाढली आहे. लवकरच चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित केला जाणार आहे. १७ एप्रिलला  हा चित्रपट  प्रदर्शित होणार आहे.
Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!