Wednesday, April 24, 2024
Homeनगरकर्जत : ताजु येथे विद्यार्थ्यांनी भरवला बाजार

कर्जत : ताजु येथे विद्यार्थ्यांनी भरवला बाजार

कुळधरण (प्रतिनिधी)- कर्जत तालुक्यातील ताजू जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दफ्तरमुक्त शनिवार उपक्रमांतर्गत पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शाळेत बाजार भरवला. मुख्याध्यापक दिपक सुपेकर तसेच शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी बाजार भरवला. या उपक्रमाला ताजू ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पालेभाज्या,फळभाज्या व इतर वस्तूंची खरेदी केली. या उपक्रमाचे पालकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

ताजू शाळेत प्रथमच भरवण्यात आलेल्या बाजाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.शालेय विद्यार्थ्यांना खरेदी-विक्री व्यवहाराचे ज्ञान मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.बाजारात मुलांनी भाजीपाला,फळे, कडधान्य,खाद्यपदार्थ यासह विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या.स्वतःच्या शेतात पिकवलेला माल विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी आणला होता. या उपक्रमामुळे शाळा परिसराला बाजाराचे रुप आले होते. ग्रामस्थांनी उस्फूर्त खरेदी करून विद्यार्थ्यांना चांगला प्रतिसाद दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या