कपिल शर्माने घेतले शनिदर्शन

0
सोनई (वार्ताहर) – ‘कॉमेडी नाईट विथ कपिल शर्मा’ या गाजलेल्या मालिकेचा निवेदक कपिल शर्मा व दिग्दर्शक राजीव डिंग्रा यांनी सोमवारी रात्री उशिरा शनिशिंगणापूर येथे येऊन शनी देवाचा अभिषेक केला व दर्शन घेतले.
दिग्दर्शक राजीव डिंग्रा यांचा नवीन हिंदी चित्रपट ‘फिरंगी’ हा नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने या चित्रपटाची संपूर्ण टीम शनिदेवाचे आशीर्वाद घेण्यासाठी आली होती. शनी चौथर्‍यावर जाऊन टीमने दर्शन घेतले.
देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात अभिनेता शर्मा व दिग्दर्शक डिंग्रा यांचा विश्‍वस्त अप्पासाहेब शेटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
देवस्थान राबवीत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले यांनी दिग्दर्शक डिंग्रा यांना दिली दिली. त्यावर श्री. डिंग्रा म्हणाले, देशातील मायबाप दर्शकांच्या आशीर्वादाने आमचा शो देशात गाजत आहे.
शनिशिंगणापूर गावाविषयी अनेकदा ऐकले होते. आमच्या शोमध्ये या गावविषयी एखादा एपिसोड करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी देवस्थानचे विश्‍वस्त आदिनाथ शेटे, डॉ. संपत खोसे, जयराम काळे, मयूर बनकर संदीप गोंदकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*