Thursday, May 2, 2024
Homeनगरकापरेवाडी येथे तीव्र पाणीटंचाई

कापरेवाडी येथे तीव्र पाणीटंचाई

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

तालुक्यातील कापरे वाडी येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

- Advertisement -

यासंदर्भात गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये नागरिकांनी म्हटले आहे की, कापरे वाडी येथील प्रभाग 3 मधील ग्रामपंचायतीच्या दोन्ही विहिरींना भरपूर पाणी आहे मात्र तरीदेखील या परिसरातील नागरिकांना मागील एक वर्षांपासून पाणीपुरवठा केला जात नाही. या प्रभागामध्ये येणारी जलवाहिनी बंद असल्यामुळे नागरिकांना पाणी मिळत नाही. पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांची चांगलेच हाल होत आहेत.

यामुळे संबंधित व्यक्तींवर याबाबत तातडीने कारवाई करावी व जोपर्यंत नियमित पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीचे कोणतीही कर भरणार नाही अशी मागणी नागरिकांनी यापूर्वी केली होती. मात्र तरीदेखील पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला नाही. यानंतर या ठिकाणी आज भाजपा किसान आघाडीचे सुनील यादव यांनी भेट देऊन पाहणी केली असून संबंधित अधिकार्‍यांना प्रभाग 3 मधील पाणीपुरवठा तातडीने सुरू करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने दिला आहे.

सुनील यादव यांनी सांगितले की स्थानिक अधिकारी व पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा झाली असून प्रभाग 3 मधील नागरिकांना रोज टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे मान्य केले आहे. याप्रमाणे पाणी पुरवठा न झाल्यास पदाधिकारी व अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी करून कारवाईस भाग पाडू.

- Advertisment -

ताज्या बातम्या