Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

शेंबड पोरगंही सांगेल युतीचा विजय निश्चित : मुख्यमंत्री फडणवीस

Share

नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून नारायण राणे यांचा भाजप प्रवेशावरून चर्चा होती. अखेर आज यावर पडदा पडला असून नारायण राणेसह दोन्ही मुलानी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन झाला आहे.

दरम्यान कणकवली मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा असून या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष चंद्र्कांत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

कणकवलीतून नितेश राणे भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. परंतु शिवसेना- भाजपा अशी युती असली तरी सेनेने भाजपाच्या विरोधात देखील आपला उमेदवार या मतदारसंघात दिला आहे. प्रवेशावेळी राणे म्हणाले कि या दिवसाची मी फार दिवस वाट पाहात होतो, आज माझ्यासह निलेश राणे, नितेश राणे यांचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश झाला असे मी जाहीर करतो असंही त्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि, यंदाच्या निवडणुकांमध्ये कोणत्याही प्रकारची चुरस दिसून येत नाही, आम्ही काय स्वतःला मोठे समजत नाही परंतु पण तुम्ही शेम्बड्या पोराला विचारलं तर तो देखील युतीचा विजय विजय निश्चित असल्याचे सांगेल. तसेच कणकवली मतदारसंघात ६५ ते ७० टक्के मते नितेश राणेंना मिळतील, पण हि निवडणूक शनतपणे, प्रेमाने, जनतेमध्ये जाऊन लढणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!