रविवारी कन्हैय्याकुमार नगर शहरात

0
जातीवादी शक्तीच्या विरोधात लॉन्ग मार्च
अहमदनगर (प्रतिनिधी) – ऑल इंडियन स्टुंडन्ट फेडरेशनचे व जेएनयुचे माजी अध्यक्ष कन्हैय्याकुमार हे रविवारी 6 ऑगस्टला नगर शहरात येणार आहेत. कन्हैय्याकुमार यांचे औरंगाबाद रोडवरील एका लॉनमध्ये भाषण होणार असून त्यापार्श्‍वभूमीवर पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागण्यात आलेली आहे. यावेळी कन्हैय्याकुमार जिल्ह्यातील तरूण शेतकर्‍यांनी शेतकरी संप यशस्वी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासोबत अन्य महत्वाच्या विषयावर नगरकरांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती संयोजकांच्यावतीने देण्यात आली.
शहीद भगतसिंग यांचे स्वप्न जिवंत ठेवण्यासाठी 15 जुलैपासून ऑल इंडियन स्टुंडन्ट फेडरेशनचे व जेएनयुच्यावतीने कन्याकुमारी येथून पंजाबपर्यंत लॉन्ग मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. हा लॉन्ग मार्च रविवारी नगरमध्ये दाखल होणार आहे. नगरमधून हा मार्च पुणे, मुंबईमार्ग गुजराथला जाणार आहे. या मार्चचा समारोप शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मृतीस्थळी फिरोजपूर पंजाब येथे होणार आहे.

चांदणी चौकात कन्हैय्याकुमार आणि मार्चचे स्वागत करण्यात येणार असून ते आंबेडकर पुतळा, शिवाजी महाराज पुतळा, महात्मा गांधी पुतळा, प्रेमदान मार्गे प्रोसेफर कॉलनी, श्रीराम चौक मार्गे औरंगाबाद रोडवर सभास्थळी जाण्यात येणार आहे. देशातील वाढती बेकारी, शिक्षणाचे बाजारीकरण, जातीय व धार्मिक हिंसाचार, शेतकरी कर्जमाफी, आरक्षण, निडणुकांमध्ये सुधारणा या विषयावर कन्हैय्याकुमार नगरमध्ये विचार व्यक्त करणार असल्याची माहिती संतोष खोदडे, रामदास वाघस्कर, रजंन लांडे आदींनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाकपचे जिल्हा सचिव ऍड. सुभाष लांडे, ऍड. सुधीर टोकेकर, बन्सी सातपुते, बहीरनाथ वाकळे, संध्या मेढे, निलीमा बंडेलू, आदी उपस्थित होते.
………..
कन्हैय्याकुमार यांच्या सभेला विरोध झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये, यासाठी पोलीस अधीक्षक यांची भेट घेण्यात आली आहे. पोलीसांकडून सहकार्याचे आश्‍वासन देण्यात आले असून यासह जातीवादी शक्ती आणि पक्ष सोडून अन्य सर्वांनी आमच्या सोबत येण्यास सहमती दर्शवली आहे. ऐनवेळी आमची रेडगार्ड संघटना कन्हैय्याकुमार यांचे संरक्षण करण्यास सक्षम असल्याचे खोडदे यांनी सांगितले.
……………

LEAVE A REPLY

*