मोदी पंतप्रधान नव्हे, प्रचार मंत्री : कन्हैय्या कुमारची टीका

0

मोदींनी हिटलर होण्याची स्वप्ने पाहू नये

अहमदनगर (प्रतिनिधी) – हक्काची मागणी केल्यामुळे आम्हाला गुन्हेगार ठरवत देशद्राहाचा आरोप करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विविधेतेने नटलेल्या या देशात फुट पाडण्याचे काम करत आहेत. देशातील सगळे हिंदू मोदीवादी नाहीत आणि सगळे मुसलमान दहशतवादी नाहीत. डिजीटल इंडियात मोदींचे योगदान काय? असा सवाल करत देशाला डिजीटल नव्हे, तर डिसकर्व्हर इंडियाची (सर्वांना एकत्र आणण्याची) गरज आहे. या देशाचे पंतप्रधान सरकारी कंपन्या सोडून खासगी कंपन्यांचा प्रचार करत असल्याचा आरोप जवाहरलाल विद्यापिठ विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार यांनी केला.
ऑल इंडिया स्टूडंट्स   फेडरेशन आणि ऑल इंडिया युथच्यावतीने लॉग मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. या मार्चचे रविवारी सायंकाळी नगरमध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी डाव्या संघटना, आंबेडकरवादी संघटना, कम्युनिष्ठ पक्ष यांच्यावतीने कन्हैय्या कुमार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॉ. सुभाष लांडे, अ‍ॅड. सुधीर टोकेकर, आर्टिटेक अर्शद शेख, हमाल पंचायत अध्यक्ष अविनाश घुले, माजी महापौर अभिषके कळमकर यांच्यासह महिला अबालवृध्द मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
आपल्या जोशपूर्ण भाषणात कन्हैय्या कुमार यांनी पंतप्रधान मोदी यांचा समाचार घेतला. या देशात एकाच वेळी जनतेवर भगवा विचार लादण्यासोबत त्यांच्याकडून त्यांचे स्वातंत्र काढून घेण्यात येत आहे. या देशाला आता रिकर्व्हरी इंडियाची गरज असून आमचे स्वतंत्र आणि संस्कृती परत करा. या देशाच्या पंतप्रधानांना पाक आणि चिनची चिंता आहे. त्याऐवजी त्यांनी देशातील आदिवासी, गरबी, अल्पसंख्याक आणि दलितांची चिंता करावी. हा देशा सावरकरांचा नसून आंबेडकरांचा आहे. यामुळे मोदींनी हिटलर होण्याचा विचार सोडून द्यावा. मोदी हिटलर नाही आणि देशातील जनता यहूदी नाहीत. यामुळे मोदीच्या हुकुमाशाही विरोधात देशातील जनता लोकशाही मार्गाने लढेल असा इशारा कन्हैय्या कुमार यांनी यावेळी दिला.
देशाच्या स्वतंत्र्य लढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगदान काय? या देशाच्या सिमा जवान संभाळ असून देशातंर्गत शेतकरी कष्ट घेत आहेत. या देशात सध्या भगवा झेंडा हात घेवून सामान्यांचे खून पाडण्यात येत आहेत. या भगव्या दशहतवादा विरोधात उभे राहण्यासाठी हिरवा, पिवळा आणि निळ्या झेंड्यांनी स्वतंत्रपणे न लढता एकत्र येत इंद्रधनुष्य झेंडा उभारून लढा देण्याची वेळ आली आहे. सरकारी कंपन्याचा प्रचार करण्याचे सोडून देशाचे पंतप्रधान अंबानी, अदानीच्या खासगी कंपन्यांचा प्रचार करत आहेत. या देशात मासाहार करणे पाप आहे. मात्र, त्या ठिकाणी गो हत्याच्या नावाखाली सामान्यांचे मुडदे पाडण्यात येत आहे. जगात गाय दूध देते. मात्र, आपल्या देशात गायीवरून राजकारण करत सत्तेची खूर्ची मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला.
स्वच्छता अभियानात खर्‍याअर्थाने नागपूरपासून दिल्लीपर्यंत आरएसएसचा कचरा साफ करण्याची वेळ आली आहे. या देशातील दलित, गरीब, अल्पसंख्याची मुले शिकू नयेत, यासाठी सरकार शाळा सुरू करण्याची सरकारची परिस्थिती असल्याचे सांगण्यात येत आहे. गरीब, दलितांची मुले शिकली तर ते इतिहास तपासतील आणि आपले पितळ उघडे पडले, या भितीने गरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव असल्याचा आरोप यावेळी कन्हैय्या कुमार यांनी केला.
…………
शेतकरी आत्महत्या वाढल्याने मोदीनी पिक विमा योजना काढली. मात्र, या योजनेत शेतकर्‍यांना फायदा होण्याऐवजी विमा कंपनीला 10 हजार कोटींचा फायदा झाला. उपराष्ट्रपती निवडणुकीत गांधीजींचा नातू निवडणूक हरला असला तरी जनतेच्या मनात त्यांनी स्थान निर्माण केले आहे. स्वतंत्रपूर्वी देशातील जनता इंग्रजा विरोधात लढली. आता फोडाफोडीच्या राजकारणाच्या पावला चालणार्‍या भाजपाच्या सरकार विरोधात लढण्याची वेळ आली आहे आणि ही लढाई घरात बसून लढवी लागणार नाही, त्यासाठी बाहेर पडावे लागणार आहे. यासाठी आम्ही तयार असल्याचा इशारा कन्हैय्या कुमार यांनी यावेळी दिला.
…………
अहमदनगर हे ऐतिहासीक शहर आहे. या शहरात अनेक थोर व्यक्तींचे वास्तव राहिलेले आहे. मात्र, खोटी स्वप्ने दाखवणारे उद्या अहमदनगर या नावात नगर हा हिंदू शब्द असून अहमद हा उर्दू शब्द असल्याची सांगितली. उद्या अहमदनगरचे नाव हे लोक गोडसेनगर देखील ठेवण्यास तयार होती. यामुळे समाजा समाजात फूट पाडणार्‍या विरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज असून हिंदू आणि मुस्लीम समाजाने एकत्र या विरोधात लढावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
………..
कन्हैय्या कुमार यांच्या सभेचे नगरकरांना आकर्षण होते. राष्ट्रीय पातळीवरील विद्यार्थी संघटनेचा नेता नगरमध्ये काय बोलणार याकडे नगरकरांचे लक्ष लागले होते. अलिकडच्या काही वर्षात पहिल्यांदा कम्युनिष्ठ पक्षाने मोठ्या सभेचे आयोजन केले होते. यामुळे सभेला चांगलेच गॅलमर आले होते. तरूण, तरुणी, महिला, पुरूष आणि वयोवृध्दांची चांगलीच गर्दी या ठिकाणी झाली आहे. सभा संपल्यानंतर कन्हैय्या कुमार यांनी डफावर आझादीचे गीत गायले. त्यांना उपस्थित तरूणांनी मोठा प्रतिसाद दिला.

LEAVE A REPLY

*