बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणौत साकारणार जयललीतांचे व्यक्तिमत्व

0
मुंबई : गत वर्षापासून बॉलिवूडमध्ये बायोपिक साकारण्याचे सत्र सुरू आहे. राजकारणी, खेळाडू यांच्या यशोगाथेवर बेतलेल्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. निवडणुकांच्या तोंडावर आल्याने राजनैतिक बायोपिक मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. यातच आणखी एका राजकारणी व्यक्तिमत्वावर बायोपिक साकारण्यात येणार आहे.

साऊथ चित्रपटातील अभिनेत्री आणि राजकारणात उच्च स्थानावर आपले नाव कोरलेल्या जयललीता यांच्या आयुष्यावर बायोपिक साकारण्याची तयारी सुरू आहे. तर जयललीता यांचे व्यक्तिमत्व बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणौत साकारणार आहे.

जयललीता यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन एएल विजय करणार असून जो केवी विजयेंद्र प्रसाद चित्रपटाचे लेखण करणार आहेत. तर चित्रपटाची निर्मिती विष्णु वर्धन इंदुरी आणि शैलेश आर सिंह करणार आहेत.

LEAVE A REPLY

*