कंगणा करणार स्वत:च्या बायोपिकचं दिग्दर्शन

0
मुंबई : ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाद्वारे कंगना राणौतने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. या चित्रपटातील कंगनाच्या अभिनयाचे जितके कौतुक झालेत, तितकीच तिच्या दिग्दर्शनाचीही प्रशंसा झाली. सोबतच ती दिग्दर्शित करणार असलेल्या तिच्या पुढच्या चित्रपटाबद्दलची उत्सुकताही वाढली. सध्या कंगना ‘मेंटल है क्या’ आणि ‘पंगा’ या दोन चित्रपटात बिझी आहे. पण हे दोन चित्रपट हातावेगळे करताच, कंगना एक नवा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. होय, कंगना स्वत:चे बायोपिक दिग्दर्शित करणार आहे.

कंगणा स्वत:चे जीवन मोठ्या पडद्यावर दाखवू इच्छिते. ‘बाहुबली’चे लेखक केवी विजेंद्र प्रसाद या बायोपिकचे लेखन करणार असून कंगणा चित्रपटासाठी दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाचे प्री-प्रोडक्शन कंगणाचे आगामी ‘पगा’ आणि ‘मंटल है क्या’ या चित्रपटांनंतर सुरू होणार आहे.

कंगणाच्या बायोपिकची माहिती समोर आल्यानंतर अनेकांनी रितिक रोशन आणि करण जौहर यांच्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अनेकांनी या बायोपिकमध्ये रितिक रोशन आणि करण जौहरच्याही भूमिका असणार का? असा सवाल केला आहे. त्यावर उत्तर देताना कंगणाने सांगितलं की, ‘हा, हे खरं आहे की माझ्या जीवनावर आधारित चित्रपटाचं मी दिग्दर्शन करणार आहे.

परंतु चित्रपटात कोणत्याही भूमिकेला ब्लॅक अॅन्ड व्हाईट शेडमध्ये दाखवण्याचा माझा उद्देश नाही. त्याऐवजी चित्रपटात माझ्या आयुष्यातील काही खास, महत्त्वाच्या क्षणांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. माझ्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे माझ्यावर मला जज न करता प्रेम करतात. हा चित्रपटात माझ्या आयुष्यातील चढ-उतारावर आधारित असल्याचं’ तिनं सांगितलं.

LEAVE A REPLY

*