Type to search

जगातील तिसर्‍या उंच शिखरावर पुण्यातील 10 जणांनी फडकावला तिरंगा

Featured maharashtra देश विदेश

जगातील तिसर्‍या उंच शिखरावर पुण्यातील 10 जणांनी फडकावला तिरंगा

Share
पुणे- पुण्यातील दहा गिर्यारोहकांनी जगातील तिसरे आणि भारतातील सर्वात उंच कांचनजुंगा शिखर सर करत तिरंगा फडकावला आहे. गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील दहा जणांच्या संघाने आज सकाळी दहाच्या सुमारास ही अभिमानास्पद कामगिरी केली आहे. आठ हजार 586 मीटर उंच असलेले माउंट कांचनजुंगा उंचीनुसार जगातील तिसरे तर भारतातील पहिले शिखर आहे.

माउंट कांचनजुंगा शिखरावर आत्तापर्यंत चारशे गिर्यारोहकांनी झेंडा फडकावला आहे. कांचनजुंगा शिखर चढणे हे तांत्रिकदृष्ट्या अवघड असते. आशिष माने, रुपेश खोपडे, भूषण हर्षे, आनंद माळी, प्रसाद जोशी, कृष्णा ढोकले, डॉ. सुमित मांदळे, विवेक शिवदे, किरण साळस्तेकर आणि जितेंद्र गवारे या गिरीप्रेमींनी शिखराची चढाई केली आहे. ही भारतातील सर्वात मोठी नागरी मोहीम ठरली आहे. पर्यावरण संवर्धनाचं संशोधन करण्यासाठी आवश्यक असलेले नमुने (अतिउंचावरील माती आणि दगड) या मोहिमेत गोळा करण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!