Video : कानबाई मातेच्या जयजयकाराने परिसर दुमदुमला; कानबाई मातेची विसर्जन मिरवणूक

0
नवीन नाशिक (दिलीप कोठावदे) | श्री कानबाई माता सार्वजनिक उत्सव समितीकडून दरवर्षी कानबाई माता सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. आज कानबाई मातेच्या विसर्जन मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात झाली.

या मिरवणुकीसाठी महिलांची लक्षणीय गर्दी असून परिसरात घराघरातून स्थापन केलेल्या कानबाई मातेच्या विसर्जनासाठी मिरवणुका काढल्या जात आहेत.

नाशिकमधील उत्तमनगर, पवननगर, सावतानागर, राजरत्ननगर, साईबाबा नगर, शिवाजी चौकातून किमान ५५ ते ६० मिरवणुका निघाल्या आहेत. या परिसरात खानदेश म्हणजे कसमादे, जळगाव, धुळे नंदुरबार परिसरातील रहिवाश्यांची संख्या लक्षणीय आहे.

त्यामुळे याठिकाणी खानदेशातील सर्वच पारंपारिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला होता. नगरसेवक मुकेश शहाणे, निलेश ठाकरे, रत्नमाला राणे, छाया देवांग मिरवणुकीत सहभागी झाल्या आहेत.

यावेळी लोकप्रतिनिधीदेखील कानबाई मातेच्या विसर्जन मिरवणुकीत थिरकले होते. त्यामुळे उपस्थितांच्या गोटात हा चर्चेचा विषय होता. तर त्यांच्यासोबत नाचण्यासाठी परिसरातील अनेकजण याठिकाणी जाऊन पोहोचले होते. अनेकांनी यावेळी फोटोसेशनदेखील केले.

 

LEAVE A REPLY

*