Type to search

Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

कांबळेंचा सेना प्रवेश ठरल्या वेळीच !

Share

5 सप्टेंबरला मातोश्रीवर शिवबंधन बांधणार

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- भाऊसाहेब कांबळे यांच्या उमेदवारीला शिवसेनेच्या एका गटाकडून विरोध होत असला तरी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या संमतीने कांबळे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे, त्यामुळे काहीही झाले तरी ठरल्याप्रमाणे येत्या 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता मातोश्रीवर भाऊसाहेब कांबळे हातात शिवबंधन बांधणार असल्याचा ठाम विश्वास सेनेच्या एका पदाधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर दैनिक सार्वमतशी बोलताना व्यक्त केला.

श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी 31 जानेवारी रोजी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनाम दिला. त्यापूर्वी त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची तीन वेळा मुंबईत भेट घेतली. पहिल्या भेटीनंतर पक्षपातळीवर मतदारसंघातील परिस्थितीची माहिती घेतलेल्यानंतर कांबळे यांना आमदारकीचा राजीनामा देण्यास स्वतः पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगितले. एवढीच नव्हे तर मुंबईहून वेळेत पुण्याला पोहचण्यासाठी शिवसेनेच्यावतीने स्वतंत्र विमानाची सोय करुन देण्यात आली. एकदा दिलेला शब्द मोडणे ही शिवसेनेची परंपरा नाही ही परंपरा स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून चालत आली आहे. ती उध्दव ठाकरे यांनीही जपली आहे. त्यामुळे कांबळे यांना दिलेला शब्दाप्रमाणे सर्व काही घडणार आहे. असा विश्वास या पदाधिकार्‍याने दैनिक सार्वमतशी बोलताना व्यक्त केला. दरम्यान, कांबळे यांच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी गेलेल्या एका गटाने काल पक्षाचे सचीव मिलींद नार्वेकर यांची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली हे समजू शकले नाही.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!