Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

कांबळे यांच्या सेना प्रवेशाला शनिवारपर्यंत पावसाचा ‘ब्रेक’

Share

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेना प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या भाऊसाहेब कांबळे यांच्या सेना प्रवेशाला मुंबईतील जोरदार पावसाने ‘ब्रेक’ दिला आहे. आता हा प्रवेश शनिवार 7 सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन बडदे यांनी दिली.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर कांबळे यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता मातोश्रीवर त्यांचा पक्षप्रवेश ठरला होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक भागात वाहतुकीची कोंडी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर आजचा भाऊसाहेब कांबळे यांचा प्रवेश दोन दिवस लांबणीवर टाकण्यात आला असून शनिवार 7 सप्टेंबर रोजी दुपारी हा प्रवेश होईल, असे ‘मातोश्री’वरून कळविण्यात आल्याची माहिती शहर प्रमुख सचिन बडदे यांनी दिली. ‘मातोश्री’वरील या निरोपामुळे भाऊसाहेब कांबळे यांना शिवसेना प्रवेशासाठी आणखी दोन दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!