कमालपूरच्या शेतकर्‍याने केली यंत्राच्या सहाय्याने उस लागवड

0
माळवाडगाव (वार्ताहर) – शेतमालाचे बाजारभाव अन शेतीचा मजूर खर्च यात कमालीची तफावत आहे. शेतकर्‍यांना मजुरीवर खर्च केल्याशिवाय पर्याय नाही. ऊस लागवड करिता एकरी चार हजार रुपये भाव आहे.
हा खर्च टाळण्यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर शिवारातील उत्तमराव वर्पे या शेतकर्‍याने ट्रॅक्टरच्या सरी यंत्राच्या सहाय्याने ऊस लागवड करुन 10 एकरातील 40 हजार रुपये लागवड खर्च वाचवून यशस्वी उस लागवड प्रयोग केला आहे.
कांदा लागवड एकरी 7 ते 8 हजार रुपये, कापूस वेचणी 10 रुपये किलो, उस लागवडीसाठी एकरी 4 ते 4500 हजार रुपये भाव आहे. एवढे करुन मजूर वाहतुकीसाठी दिवसाला 500 ते 800 रुपये खर्च शेतकर्‍यांच्याच माथी बसत आहेत.
छोट्या शेतकर्‍यांना एकर दोन एकराचा खर्च सहन करावा लागतो. परंतु पाच एकरा पुढील शेतकर्‍यांना उस लागवडीचा खर्च परवडत नाही. कमालपूर शिवारातील उत्तमराव वर्र्पेे या शेतकर्‍याने भामाठाण येथे एक शेतकर्‍याने ट्रॅक्टर सरी रिझरला घरगुती पद्धतीने उस लागवड केल्याचे समजले.
वर्पे यांनी भामाठाण येथे जाऊन प्रत्यक्ष या प्रयोगाची पाहणी केली. यामध्ये थोडी फार सुधारणा करून स्वत: साडेचार फुटाच्या सरी रिझरला दोन पीव्हीसी पाईप बांधून उसाची लागवड करता येईल अशी व्यवस्था केली. हे घरगुती उपाय करण्यास रुपया देखील खर्च आला नाही.
अगोदर सरी पाडल्यानंतर पुन्हा सरी यंत्राने उस लागवड केली. टिपरामधील अंतर ट्रॅक्टरच्या गतीवर कमी जास्त करता येते. दोन दिवस पाणी देण्यास उशिर झाला तरी टिपरू मातीआड झालेले असते. त्यामुळे वाळत नाही. उस तोडून बेणे खांडणे, कॅरेटमधून लागवडच्या शेतात आणणे, ऐवढाच किरकोळ खर्च येतो. परिसरातील हा प्रयोग पाहून अनेक शेतकर्‍यांनी या उस लागवडीचे कौतुक केले आहे.

 

LEAVE A REPLY

*