कमल हासन ‘या’ चित्रपटानंतर घेणार ‘चित्रपट संन्यास’

0

मुंबई : कमल हासन यांचे फिल्मी करिअर शानदार राहिले. साऊथसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी एकापेक्षा एक हिट सिनेमे दिलेत. पण आता कमल हासन यांच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. क्रोनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, ‘इंडियन 2’नंतर कमल हासन अभिनयातून संन्यास घेणार आहेत. स्वत: कमल हासन यांनी एका पत्रपरिषदेत ही माहिती दिली.

येत्या १४ डिसेंबरपासून ‘इंडियन 2’चे शूटींग सुरू होत आहे. हा चित्रपट १९९६ मध्ये आलेल्या त्यांच्या ‘इंडियन’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सीक्वल आहे. या चित्रपटात त्यांच्या अपोझिट काजल अग्रवाल दिसणार आहे. ‘2.0’चे दिग्दर्शक शंकर हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. इंडियन 2’ हा माझा अखेरचा चित्रपट असेल. यानंतर मी अभिनय कायमचा सोडणार आहे, असे त्यांनी सांगितले.

राजकारणात एन्ट्री
अभिनेते रजनीकांत यांच्यानंतर कमल हासन यांनी राजकरणात एन्ट्री केली आहे. ‘मक्कल नीथी मय्यम’ असे त्यांच्या राजकीय पक्षाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीही कमल हासन यांनी अभिनय कायमचा सोडण्याचे संकेत दिले होते. लोकांना मी राजकीय नेता म्हणून नाही तर अभिनेता म्हणून अधिक आवडतो, मला माहित आहे. आता माझ्यातील नेत्याची ओळख मी त्यांना करून देणार आहे. माझ्यातील या नेत्यावरही लोक तितकेच प्रेम करतील, हा माझा विश्वास आहे, असे ते म्हणाले होते

LEAVE A REPLY

*