TWEET : कमाल हसन यांनी शेयर केले ‘विश्वरुपम 2’चे फोटो

0

नुकतेच कमल हसन यांच्या ‘विश्वरुपम 2’ चित्रपटाचे चित्रीकरण संपले असून कमल हसन यांनी शेवटच्या दिवशी संपूर्ण टीमसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीत (ओटीए) चित्रपटाचे शेवटचे चित्रीकरण पार पडले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये ओटीएचे कौतुक करताना असे म्हटले आहे की, विश्वरुपम 2 चे चित्रीकरण करत आहोत आणि शेवटचे काही दिवस उरले आहेत. ओटीए चेन्नईचा भारताला आणि मला नेहमीच अभिमान आहे. ही एकमेव अकादमी आहे जिथे महिलांना प्रशिक्षण दिले जाते. या महिलांचा मी सन्मान करतो.

हिंदीमध्येही कमल हसन यांच्या आगामी ‘विश्वरुपम 2’ चित्रपटाचे चित्रीकरण होत आहे. जेव्हा ‘विश्वरुपम’ चित्रपट प्रदर्शित झाला होता हा चित्रपट तेव्हा वादात अडकला होता. पण या चित्रपटाने तरीही बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले होते. ‘विश्वरुपम’ चित्रपटाला घिबरन या संगीतकाराने संगीत दिले होते. त्याचीच ‘विश्वरुपम 2’ साठीही संगीतकार म्हणून निवड करण्यात आली आहे.

मला विश्वरुपम हा चित्रपट वैयक्तिकरित्या फार जवळचा आहे. प्रेक्षकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन या चित्रपटामुळे बदलला.

LEAVE A REPLY

*