नाशिक, ता. १२ : जगभरातील भारतीय विवाहितांच्या सौदर्यस्पर्धा असलेल्या हॉट मॉन्ड मिसेस इंडिया वर्ल्डवाईड २०१७च्या अंतिम स्पर्धकांमध्ये नाशिककर कल्याणी शिंदे यांची निवड झाली आहे.

या स्पर्धेसाठी जगभरातील एकूण ३ हजार विवाहित महिला स्पर्धेकांनी अर्ज केला होता. त्यापैकी १५०० स्पर्धकांची मुंबईत प्रवेश चाचणी झाली.

त्यातून ६० स्पर्धकांना अंतिम स्पर्धेसाठी निवडण्यात आले असून त्यांना २७ जुलैला व्हिएतनाम येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे.

यंदाची अंतिम स्पर्धा ५ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे होणार आहे.

दोन मुलांच्या आई असलेल्या २९ वर्षीय सौ कल्याणी विक्रम शिंदे या नाशिकच्या एका शाळेत शिक्षिका आहेत. त्यांना मॉडेलिंगची आवड असून या स्पर्धेतील निवडीमुळे त्यांचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.

LEAVE A REPLY

*