Friday, May 3, 2024
Homeराजकीयतिरंग्यावर भाजपाचा झेंडा; विरोधी पक्षाकडून संताप

तिरंग्यावर भाजपाचा झेंडा; विरोधी पक्षाकडून संताप

दिल्ली | Delhi

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानचे माजी राज्यपाल कल्याण सिंह (former Uttar Pradesh Chief Minister Kalyan Singh) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. मात्र यावेळी घडलेल्या एका प्रकारामुळे सध्या संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

दिलासा! भारतातील दैनंदिन करोना बाधितांची संख्या २५ हजारांवर

दरम्यान कल्याण सिंह (Kalyan Singh) यांच्या अंत्यदर्शनाचा भाजपने (BJP) ट्वीट केलेला फोटोत कल्याण सिंह यांच्या पार्थिक राष्ट्रध्वज दिसून येत आहे. पण त्याचा निम्मा भाग हा भाजपच्या झेंड्याने (BJP flag) झाकला गेल्याचे दिसून येत आहे. हा फोटो सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत असून त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. दुसरीकडे यावरून राजकीय आरोप सुरू झाले आहेत.

युथ काँग्रेसचे (Youth congress) श्रीनिवास बीव्ही (Srinivas BV) यांनी फोटो ट्वीट करत नव्या भारतात पक्षाचा झेंडा तिरंग्यावर ठेवणं ठीक आहे का? असा सवाल विचारला आहे.

तसेच समाजवादी पक्षाचे प्रवक्ते घनश्याम तिवारी (Ghanshyam Tiwari) यांनीदेखील भाजपावर टीका केली आहे. देशापेक्षा मोठा पक्ष, तिरंग्याच्या वरती झेंडा. भाजपा नेहमीप्रमाणे..कोणतीही खंत, पश्चात्ताप, खेद, दु:ख नाही अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या