Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

कळवण : नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने दोन मुलांचा बुडून मृत्यू

Share

कळवण :  शहरालगत असलेल्या बेहडी नदीपात्रातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. स्वप्निल राजेंद्र ठाकरे (वय १५) रा. शिवाजी नगर, कळवण, मयूर दत्तु वाघ (१६)  रा गणेश खेडगाव अशी मृत मुलांची नवे आहेत. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज शनिवार असल्याने सकाळच्या सत्रात शाळा होती. शाळा सुटल्यानंतर इयत्ता नववीतील विद्यार्थी स्वप्निल राजेंद्र ठाकरे (वय १५)  रा. शिवाजी नगर कळवण व इयत्ता दहावीतील विद्यार्थी मयूर दत्तु वाघ (१६) रा गणेश खेडगाव हे दोघे एक वाजेच्या सुमारास प्रकल्प तयार करण्यासाठी व वाढदिवस साजरा करण्यासाठी घरात सांगून घराबाहेर पडून कळवण शहरालगत असलेल्या बेहडी नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते.

या नदीपात्रात वाळू उपशामुळे मोठमोठे खड्डे पडले असल्याने त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. पाण्यात उडी मारल्याने ते दोघेही पाण्यात बुडाले. याठिकाणी कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांनी हा प्रकार पहिला. त्यांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूला असलेले ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ पोलीस हिंमत चव्हाण अनिल निकम सचिन राऊत घटनास्थळी धाव घेतली.

पाणी खोल असल्याने त्यांना काढण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता. स्थानिक नागरिक सागर कानडे, अजय पगार, गिरीश पगार यांच्यासह इतर नागरिकांच्या मदतीने दोघांना बाहेर काढले व तात्काळ कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

शालेय विद्यार्थी नदीपात्रात बुडाल्याची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली असता नदीपात्राकडे बघ्यांची गर्दी जमली होती. तसेच उपजिल्हा रुग्णालयात कळवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ऍड शशिकांत पवार , प्राचार्य एल डी पगार व शिक्षकवृंदासह, नातेवाई व  नागरिकांनी गर्दी केली होती. इयत्ता नववीत शिकणारा स्वप्निल राजेंद्र ठाकरे हा मूळ राहणारा जुन्नर बोडरी ता बागलाण येथील रहिवाशी असून त्याची बहीण रोहिणी भरत खैरणार यांच्याकडे शिक्षणासाठी राहत होता. शाळा सुटल्यानंतर तो घरी गेला होता परंतु प्रोजेक्ट तयार करण्यासाठी जात असल्याचे कारण सांगून तर दुसऱ्याने मित्राचा वाढदिवस असल्याचे सांगून मित्रांसोबत बाहेर गेला होता. परंतु तो प्रोजेक्ट  तयार करण्यासाठी न जाता पोहण्यासाठी बेहडी नदीवर गेल्याने ही दुर्दवी घटना घडली. ही वार्ता कळवण शहरात पसरताच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मयत मयूर वाघ याचे वडील शेतकरी आहेत. त्याला एक भाऊ असून त्याच्यावर गणेश खेडगाव येथे तर  मयत स्वप्निल ठाकरे याला एक भाऊ असून त्याच्यावर त्याच्या मूळ गावी जुन्नर बोडरी ता बागलाण येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  याबाबत कळवण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!