Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

कळवण : कोबीवर रसायन फवारून तीन लाखांचे नुकसान

Share

नाशिक | प्रतिनिधी 

कळवण तालुक्यातील गोसराने येथे अज्ञात व्यक्तीने ३० गुंठे कोबी पिकावर रसायन फवारून कोबीचे नुकसान केले. या घटनेमुळे ललित सिकंदर मोरे (वय ३५) या शेतकऱ्याचे अंदाजे तीन लाखांचे नुकसान झाले आहे.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील अभोणा गावाजवळ गोसराने शिवारात शेतकरी सिकंदर मोरे यांचे शेत आहे. त्यांनी त्यांच्या गट ११६ व ११९ मध्ये ३० गुंठे कोबी पिकाची  लागवड केली होती. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या शेतात सकाळच्या सुमारास अज्ञात इसमाने रसायन सारखे औषध फवारले.

यामुळे कोबीचे पिक पूर्णपणे उध्वस्थ झाले आहे. कोणीतरी सुडाच्या मानसिकतेने हा प्रकार केल्याचे निदर्शनास येताच मोरे यांनी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!