Type to search

कळवण : साकोरेपाडा येथे मतिमंद तरुणीवर दोन जणांचा बलात्कार

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

कळवण : साकोरेपाडा येथे मतिमंद तरुणीवर दोन जणांचा बलात्कार

Share

कळवण। प्रतिनिधी : तेवीस वर्षीय विकलांग व मतिमंद तरुणीवर दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कळवण तालुक्यातील साकोरेपाडा येथे घडली आहे. संशयितांना पोलिसांनी अटक केली असुन या प्रकाराने कळवण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,पीडीत तरुणीचे आई वडील शेतात मोलमजुरी करतात. त्यांचे साकोरापाडा रस्त्यालगत शेतात झोपडीवजा घर आहे. पिडीता ही मतिमंद व विकलांग असुन तिला हालचाल करता येणेही शक्य नाही. शनिवारी पिडीतेचे आई वडील व भाऊ हे मोलमजुरीसाठी गेलेले असल्याने पीडीत तरुणी घरी एकटीच होती. त्याचवेळी रस्त्याने मोटारसायकल वरुन जाणारे कृष्णा संपत पवार (वय २७,रा.पिंपळदर ता.सटाणा) व भरत दिलीप माळी (वय २८,रा.खमताणे ता.सटाणा) हे पाणी पिण्याच्या बहाण्याने पिडितेच्या घराजवळ थांबले.

घरात सदर तरुणी एकटीच असल्याचा व आजुबाजुला कोणीच नसल्याचा फायदा उठवत दोन्ही तरुणांनी या मतिमंद तरुणीवर अत्याचार केला. दरम्यान पीडितेच्या भाऊ त्याचवेळी घरी आला असता त्याने एका आरोपीस पकडले. मात्र दुसऱ्याने तेथुन पळ काढत मोटारसायकलने फरार झाला. घराजवळ आरडाओरडा झाल्याने जवळच्याच शेतात असलेल्या आई वडीलांनी घराकडे धाव घेतली. पिडीतेच्या भावाने पळुन गेलेल्या आरोपीचा पाठलाग केला. आठंबे गावाजवळ आरोपीच्या गाडीचे पेट्रोल संपल्याने त्याला पिडीतेच्या भावाने पकडले. दोन्ही तरुणांना कळवण पोलिसांनी अटक केली असुन कळवण पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान,सदर आरोपींना आज (रविवारी) विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास अप्पर पोलिस अधिक्षक श्रीमती घारगे,पोलिस उपाधिक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक उमाकांत गायकवाड करत आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!