Type to search

नंदुरबार

यशस्वी सोलंकीची नेव्हीतील सब लेफ्टनंट पदावर नियुक्ती

Share

कळंबू। वार्ताहर- शहादा तालुक्यातील डोंगरगांव येथील राजपूत समाजातील यशस्वी सोलंकी पहिली नेवी ऑफीसर बनली आहे. जिद्द मेहनत व चिकाटीच्या जोरावर ती यशस्वी झाली.तीची समाजातील सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

राजपूत समाजातही मुली उच्च शिक्षीत होवून चुल व मुल या परंपरेला फाटा देत गगन भरारी घेत आहेत. नुकतीच पीएसआयपदी निवड झालेल्या अलाणे ता.शिंदखेडा येथील मोनिया गिरासे या मुलीनेही पोलीस उपनिरीक्षकपदी वर्णी लागली आहे. तिचा समाजाने यथोचित सन्मान केला. यानंतर यशस्वी सोलंकीने मोठी गरूड झेपघेत नेवीमध्ये सब लेफ्टनंतर पदावर आपली मोहर उमटवली आहे. यशस्वीने संपादन केलेल्या यशाचे स्तरातून कौतुक होत आहे. यशस्वी ही मुळ डोंगरगांव ता.शहादा येथील असून वडील 1997 पासून आदित्य सिमेंट आदित्यपूरम कंपनीच्या एबीपीएस आदित्यपुरम (चित्तोडगड,राजस्थान) या संस्थेत शिक्षक पदावर कार्यरत आहेत. तिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!