Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

वेळ पडल्यास विधानभवनात आंदोलन : आशुतोष काळे

Share

कोपरगाव (प्रतिनिधी) – 2014 ला चुकीचा आमदार निवडल्यामुळे मागील पाच वर्षात मतदारसंघांतील जनतेला खूप सोसावे लागले. त्यासाठी मी वेळोवेळी संघर्ष केला. 21 तारखेला मला संधी द्या. तुमच्यासाठी विधानभवनात आंदोलन करून न्याय मिळवून देईन, असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी मतदारांना दिला.

कोपरगाव तालुक्यातील धामोरी, रवंदे येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, 2014 ला मतदार संघातील जनतेने ज्या विश्वासाने तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना निवडून दिले त्या विश्वासाला त्या पात्र ठरल्या नाहीत. त्यामुळे मागील पाच वर्षात मतदार संघातील जनतेचा भ्रमनिरास झाला. तालुक्याला रब्बी अनुदानापासून वंचित ठेवले गेले. गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात होणारी कालवा सल्लागार समितीची बैठक मुंबईला होत आहे.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी पाच वर्षात झाली नाही. शेतकर्‍यांना अडीच किलोमीटर पर्यंतच तर काही ठिकाणी अडीच किलोमीटरच्या आतच शेतीसाठी पाणी दिले गेले. कोपरगाव तालुक्याच्या शेजारील सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असताना कोपरगाव तालुक्याला दुष्काळाच्या यादीतून वगळले गेले. दुष्काळ जाहीर व्हावा यासाठी शेतकर्‍यांना स्वतःच्या चितेवर बसावे लागले. ओव्हरफ्लोचे 100 टी.एम.सी पाणी गोदावरी नदीतून जायकवाडीला वाहून गेले. त्यावेळी शेतकर्‍यांना विकत पाणी दिले गेले. अशा प्रकारे पाच वर्षात सातत्याने मतदार संघातील शेतकर्‍यांवर व सर्वसामान्य जनतेवर अन्याय होत आला आहे. ज्यावेळी हे अन्याय झाले त्यावेळी मी आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात आंदोलन केले. आमरण उपोषण करून न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केलेला आहे.

माझा संघर्ष हा केवळ आपल्यासाठी होता व आपले जिव्हाळ्याचे सर्व मुलभूत प्रश्न सुटावे यासाठी आपण मला 21 तारखेला भरघोस मतांनी निवडून देऊन सेवा करण्याची संधी द्या. मागील पाच वर्षात चुकीचे लोकप्रतिनिधी निवडल्यामुळे तुमच्यावर जो अन्याय झाला तो यापुढे होऊ देणार नाही. मी आजपर्यंत तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी पाच वर्षे तालुक्यात संघर्ष केला. यापुढे तुम्हाला जर न्याय मिळाला नाही तर मी तुमच्यासाठी विधानभवनात आंदोलन करून न्याय मिळवून देईल अशी ग्वाही आशुतोष काळे यांनी मतदारांना दिली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!