Type to search

नंदुरबार

वैयक्तीक लाभ बाजुला ठेऊन समाजासाठी प्रत्येकाने झटायला हवे – सोनवणे

Share

कळंबु ता. शहादा । वार्ताहर – समाज संघटनासाठी शहादा तालुक अग्रेसर असून समाजातील प्रत्येकाने समाजास पाठिंबा देणे हे सामाजिक कर्तव्य असून सामाजिक सुख दुःखात हजर राहणे, व वैयक्तिक लाभ बाजूला ठेऊन सामाजिक लाभासाठी प्रत्येकाने झटले पाहिजे असे नाभिक समाजाचे विभागीय अध्यक्ष हारचंद सोनवणे यांनी सारंगखेडा येथील हनुमान मंदिरात झालेल्या नाभिक हितवर्धक संस्थेच्या त्रैमासिक सर्वसाधारण सभेत बोलताना सांगितले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हारचंद सोनवणे, तर प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश सैंदाने,शहादा तालुका अध्यक्ष कैलास खोंडे व मान्यवरांच्या हस्ते नाभिक सामाजाचे आराध्ये दैवत वीर संत शिरोमणी सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, करण्यात आले. त्यानंतर समाजातील अकस्मात अथवा, सीमेवर शाहिद जवान, वृद्धपकाळाने मयत झालेल्या बांधवांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबंदी, समाज प्रबोधन आदि विषयासह आगामी काळात येणार्‍या जि.प. व पंचायत समिती निवडणूकित समाजाच्या उमेदवारास पाठिंबा देणे, समाज संघटन वाढविणे, आदी विविध विषयांवर चर्चा करून विचार विनिमय करण्यात आले.

यावेळी उपस्थित समाज बांधव शहादा तालुका सचिव विनोद बोरसे, सहसचिव हेमंत सोनगिरे, कोषाअध्यक्ष श्रावण महाले,प्रसिद्धी प्रमुख योगीराज ईशी, गटप्रमुख विनोद निकम, संतोष चित्ते, मोहन महाले, अंजली बोरसे, सीमा सोनगरे, छाया वाघ, एकनाथ महाले, सुरेन्द्र महाले, बन्सीलाल महाले, जगन महाले, भिक्कन महाले, गणेश महाले, आदींसह मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास खोंडे यांनी केलं, तर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!