कैलास गिरवले यांचा मृत्यू, पोलिसांच्या समस्या वाढल्या

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- एसपी कार्यालयावर हल्ला व बेकायदा फटाके बाळगल्याप्रकरणी अटकेत असणारे नगरसेवक कैलास गिरवले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर पुण्यातील ससुन रूग्णालय येथे उपचार सुरू होते. ते पोलीस कोठडीत असल्यामुळे पोलीस याप्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता आहे.

केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या चौकशीसाठी आ. संग्राम जगताप यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात चौकशी बोलाविण्यात आले होते.त्यावेळी जमावाने आ. जगताप यांची सुटका केली होती. यावेळी जमावाने त्याठिकाणी धुडगूस घालून एसपी कार्यालय फोडले होते.

याप्रकरणी गिरवले यांना अटक करण्यात आली होती. पोलीस तपासात त्यांना तीन वेळा पोलीस कोठडी मिळाली होती. हल्ला प्रकरणातून त्यांना न्यायालयीन कोठडी मिळते तोच, सहायक पोलीस अधिक्षकांच्या पथकाने माळीवाडा येथे विनापरवानगी फटाके बाळगल्याप्रकरणी गिरवले यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल केला होता.

रविवारी गिरवले यांना विना परवानगी फटाके बाळगल्याच्या प्रकरणात कोतवाली पोलीसांकडे वर्ग करण्यात आले होते. दुपारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र याच वेळी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तत्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांना अती त्रास झाल्यामुळे थेट पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल केले होते.

दोन दिवस उलटूनही त्यांची प्रकृती चिंताजनक होती. सोमवारी दुपारी 11:30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अन्नपाणी सोडले. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. अधिक उपचारासाठी त्यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. कायदेशीर बाबी म्हणून सोमवारी (दि.16) नगर न्यायालयातून परवानगी घेण्यात आली. मात्र त्यांची प्रकृती अधिकच खालावल्यामुळे त्यांना ससुनलाच ठेवण्यात आले होते.

सोमवारी रात्री उशिरा डॉक्टरांनी गिरवले यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केलेे. मात्र त्यांना अपयश आले. याप्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात गिरवले यांच्या नातेवाईकांनी पोलिसांवर आरोप करीत तक्रार दिली आहे. स्थानिक ठाणेअंमलदार यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.

नेमके दोेषी कोण?
कौलास गिरवले यांना अटक झाल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या पायावर व्रण देखील होते. अटक झाल्याचा व मारहाण झाल्याचा धसका घेत त्यांची प्रकृती चिंताजनक झाली, असे मत त्यांच्या नातेवाइकांनी व्यक्त केले आहे. मात्र वैद्यकीय अहवालात नेमके कोण दोेषी, हे लवकरच उघड होणार आहे.
सीआयडी चौकशी होणार
गिरवले यांचा कोठडीत मृत्यू झाला आहे. त्यामुळे या घटनेचा तपास सीआयडी मार्फत होणार आहे. गिरवले यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे काही नावे दिल्याची माहिती समजते आहे. त्यामुळे गिरवले यांच्या मृत्युमूळे नगरमध्ये पुन्हा राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.
पोलिसांच्या मागे ससेमीरा
कोतवाली पोलीस ठाण्यात साठेचा मृत्यू झाला होता. त्यात अधिकार्‍यांसह पोलीस कर्मचार्‍यांना कारवाईला सामोरे जावे लागले होते. तर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर ढोकले यांचा येरवाडा जेलमध्ये मृत्यू झाला. हे प्रकरण अद्याप सुरूच असताना गिरवले प्रकरण पोलिसांच्या मागे लागले आहे. त्यामुळे गिरवले यांना मारहाण करणार्या पोलिसांमागे ससेमीरी लागणार आहे. गिरवले यांनी एका विशेष शाखेचे नाव घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
गुन्हा दाखल होणार
पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गिरवले यांचे नातेवाईक फिर्याद दाखल करण्याची शक्यता आहे. तिकडे दाखल झाली तर ती शुन्य क्रमांकाने नगरला वर्ग होईल. किंवा याप्रकरणी भिंगार अथवा कोतवालीत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. या गुन्ह्यात कोणकोणाला आरोपी केले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

*