Thursday, April 25, 2024
Homeनाशिकखुशखबर! जपानच्या कंपनीची नाशिकमध्ये ५० कोटींची गुंतवणूक; टोमॅटोवर प्रक्रिया उद्योग

खुशखबर! जपानच्या कंपनीची नाशिकमध्ये ५० कोटींची गुंतवणूक; टोमॅटोवर प्रक्रिया उद्योग

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक जिल्ह्यात टोमॅटोची मोठी बाजारपेठ आहे. गिरणारे, पिंपळगाव सह मोठ्या संख्येत टोमॅटोची   विक्री अनेक बाजारपेठेत वाढलेली असते. त्या तुलनेने चांगल्या दर्जाच्या टोमॅटो उत्पादनाला पुरेसा भाव मिळत नाही. पण, नाशिकमधील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर असून जपानची कागोम फुड्स इंडिया कंपनी नाशिकमध्ये ५० कोटींचा टोमॅटो आधारित फूड प्रोसेसिंग युनिट स्थापित करणार आहे. त्यामुळे नाशिकमध्ये रोजगाराच्या संधी वाढणार असून टोमॅटो खरेदी केल्यामुळे भावदेखील चांगला मिळण्याची आशा आहे.

- Advertisement -

भारत सरकारच्या ‘ऑपरेशन ग्रीन’ या चळवळीस पाठिंबा देण्यासाठी व वर्षभरात उच्च प्रतीची टोमॅटो उत्पादने किफायतशीर किंमतीत उपलब्ध करून देण्यासाठी कागोम फूड्स इंडिया (केएफआय) शेतकर्‍यांशी सक्रियपणे काम करत असून यामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक टोमॅटोचे उत्पादन होत असल्याने अनेकदा भाव कोसळतात त्यामुळे भाव नियंत्रित राहण्यास मदत होणार आहे.

गेल्या वर्षी फेब्रुवारीत भारत सरकारने टोमॅटो, कांदा आणि बटाटा दर स्थिर राहावेत यासाठी ‘ऑपरेशन ग्रीन’ सुरु केले होते. या पिकांमध्ये  टोमॅटो  अधिक नाजून पिक असून हाताळणे किंवा इतरत्र बाजारपेठेत पाठविणे यात पिकाचे मोठे नुकसान होते. परिणामी वाहतूक खर्च निघेनासा होतो.

टोमॅटोला नवसंजीवनी मिळण्यासाठी क्रांतीची सुरुवात करण्याची सुरुवात व्हावी या उद्देशाने जपानच्या अग्रगण्य टोमॅटो कंपनी असलेल्या कागोमे या कंपनीने टोमॅटोसाठी सर्वसमावेशक वाणची निर्मिती केली असून यातून  टोमॅटो उत्पादन वाढविण्याचा विचार कंपनीचा आहे. याबाबतचे वृत्त एका वेबसाईटने दिले असून फूड प्रोसेसिंगमध्ये यापुढे नाशिक बेस्ट डेस्टीनेशन म्हणून ओळख निर्माण होऊ पाहत आहे.

टोमॅटो प्रक्रिया उद्योगासाठी नाशिकमध्ये मोठी संधी आहे. देशातील टोमॅटोच्या एकूण उत्पादनांपैकी टोमॅटोचे प्रोसेसिंग अवघे 1% पेक्षा कमी होते. तर अमेरिकेसारख्या देशांमध्ये ही संख्या 75% इतकी आहे.

स्थानिक किंमतींवर जागतिक दर्जाचे उत्पादने सादर करण्याच्या उद्देशाने चालविलेले, कागोम फूड्सचे हे काम पुढे मोठी शिखर गाठणार आहे हे नक्की.

विशेष म्हणजे या कंपनीने शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलले असून नवनवीन वाण विकसित करण्यात आला असून याठिकाणी हे अजमावण्यात येणार आहे.

हे सर्व करताना शेतकऱ्यांचा खर्च भांडवलाची उपलब्धता तसेच शेतातील तण नियंत्रण करण्यात येणार आहे. तसेच लागवडीचे सुयोग्य नियोजन करून कमीत कमी भांडवल व अधिक फायदे यातून पहिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

वार्षिक करारानुसार शेतकऱ्यांकडून टोमॅटो विशिष्ट किंमतीत विकत घेतील. कंपनीच्या एकूण निरीक्षणात नाशिकमध्ये खूप कमी किंमतीत चांगल्या दर्जाचे टोमॅटो मिळतात. सध्या कागोम फूड्स इंडियाने 200 शेतकरी भागीदारांचे जीवन सुधारले आहे. आणखी अनेक शेतकरी पुढील काही वर्षांत जोडले जाणार असून पुढे ही संख्या1000 वर नेण्याचे नियोजन असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

केएफआयच्या सीड ते टेबल व्हॅल्यू चेनमुळे टोमॅटो प्रोडक्ट्स पोर्टफोलिओचा विकास झाला आहे. ज्यामुळे टोमॅटो पिकाचे विविध रोगांपासून संरक्षण करण्यात यश येते. तसेच जागतिक दर्जाचे उत्पादन काढता येते.

हा टोमॅटो चिरून ठेवता येतो. भडक लाल रंगाचा असतो. या टोमॅटोची चवदेखील विशिष्ट आहे. फूड सर्व्हिसमध्ये स्वयंपाकघरात वापरला जातो. टोमॅटोचा माखनी आणि कढईवर आधारित डिश, पिझ्झा, पास्ता, टोमॅटो सूप, शॉर्बा यासह अनेक ठिकाणी वापरता येतो. कागोम क्रश टोमॅटो कच्च्या टोमॅटोप्रमाणेच अन्नामध्ये चव आणि ताजेपणा देतात.

२० दशलक्ष टन्स उत्पादनासह भारत टोमॅटोचा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा उत्पादक आणि ग्राहक आहे. टोमॅटोच्या एकूण खपांपैकी प्रोसेसिंग अवघी १ टक्के आहे. हीच संख्या अमेरिकेसारख्या विकसित देशांमध्ये 75% पेक्षा जास्त आहे. त्यामुळे आम्हाला येथे खूप संधी असल्याचे कंपनीचे वरिष्ठ अधिकारी रोहित भटला सांगत होते.

अन्न प्रक्रिया क्षेत्राकडे संपूर्ण कृषी, उद्योग आणि सेवांच्या संपूर्ण पावलाचा ठसा पाहता सर्वांगीण विकासाला चालना देण्याची प्रचंड क्षमता नाशिक जिल्ह्यात आहे. यामुळे याठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील परिणामी विकास वाढीस लागेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या